दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

औरंगाबादमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हॅप्पी दीपावली बोलला म्हणून तरुणाची तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली.

  • Share this:

सचिन झिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 28 ऑक्टोबर : संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचा उत्सव पाहायला मिळतो. पण या उत्सवाला औरंगाबादमध्ये गालबोट लागलं आहे. औरंगाबादमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हॅप्पी दीपावली बोलला म्हणून तरुणाची तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली. हा सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन सणाच्या दिवशी असा प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सचिन विष्णू वाघ असं हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सचिनने आरोपीला हॅप्पी दीपावली असं म्हणत शुभेच्छा दिल्या आणि तोच आरोपीने रागात सचिनवर तलावारीने वार केले. शरीरावर अनेक धारदार तलवारीने वार झाल्यामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादमधील न्यायनगर भागात हा गंभीर प्रकार घडला आहे. स्थानिकांनी संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर हत्या करून शहरातील नारेगाव भागत लपलेल्या चार आरोपींना पुंडलीक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

इतर बातम्या - सत्ता स्थापनेबाबत सेनेची डरकाळी, 'आता जे काही होईल ते...'

दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सचिनही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांकडून त्याच्या घरच्यांना देण्यात आली. ऐन सणाच्या दिवशी घरातील मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अशा प्रकारे सचिनने जीव गमावल्यामुळे संपूर्ण वाघ कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला आहे. तर सचिनच्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत असून आरोपींची चौकशी करत आहेत. तर नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी पोलीस स्थानिकांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - साडीमुळे चंद्रकांत पाटील गोत्यात, थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी

First published: October 28, 2019, 2:33 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading