साडीमुळे चंद्रकांत पाटील गोत्यात, थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी

चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये एक लाख साड्या वाटणार असल्याची सध्या सगळीकडे चर्चा असताना आता मनसेकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 01:43 PM IST

साडीमुळे चंद्रकांत पाटील गोत्यात, थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी

कोथरूड, 28 ऑक्टोबर : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांना 1 लाख साड्या भाऊबीज म्हणून वाटणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्यांचा हा उपक्रम सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये एक लाख साड्या वाटणार असल्याची सध्या सगळीकडे चर्चा असताना आता मनसेकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. शपथ घेण्याआधी साड्या वाटणं म्हणजे हा आचारसंहितेचा भंग असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

'भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजून आमदारकीची शप्पथ ही घेतली नाही. ना त्यांना अजून मुख्यमंत्री पद मिळालं. आणि या आधीच एक लाख साडी वाटप करणे हा सरळ-सरळ आचारसंहितेचा भंग आहे.  याचा अर्थ असा निघतो की निवडणुकी पूर्वी मतदारांना अमिशरूपी साड्या वाटपाचा आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं आणि ते आश्वासन ते आता एक लाख मतदारांना साड्या वाटून पूर्ण करत आहेत' अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसे कोथरूड विभागाच्यावतीने या संदर्भात मुख्यनिवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आणि चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करत त्यांची कोथरूडमधील निवड ही रद्द करावी अशी मागणीही करणार येणार आहे.

तर 'आशा घाणेरड्या वृत्तीचा निषेध करत कोणीही भिखरूपी दिलेली साडी स्वीकारू नये. तसेच असं साडी वाटप करताना कोणीही मनसेच्या निदर्शनात आल्यास मनसे स्टाईल ने या सर्व गैरवरकाराचा विरोध केला जाईल आणि या सर्व प्रकारची जवाबदारी मनसेची नसेल असे' अशा प्रकारचा मेसेज हा मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष  सुधीर शिवाजीराव धावडे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील हा उपक्रम कसा पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरकरांविषयी एका वक्यव्यामुळे चर्चेत आले आहेत.

कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

Loading...

विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा जिंकता आल्या नाहीत. तर सेनेची गेल्यावेळी असलेली सहा आमदारांची संख्या एकावर आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असूनही त्यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली. कोथरूड मध्ये विजय मिळवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्यांचा कोल्हापूरचा गड मात्र राखता आला नाही. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पराभवाला बंडखोरी कारणीभूत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी एक व्हॉटसअप मेसेज वाचून दाखवला. या मेसेजमध्ये भाजपनं गेल्या पाच वर्षात केलेली कामं सांगण्यात आली होती. यातच शेवटी म्हटलं होतं की, सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूर सुधारणार नाही. पत्रकार परिषदेत व्हॉटसअप मेसेजची प्रिंट देण्यात आली होती. त्याचाच फोटो व्हायरल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं.

चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की, कोल्हापूरमधील पराभवाची चिकित्सा करण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली गेली. त्यावेळी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेला मेसेज वाचून दाखवला. त्यामध्ये भाजपने 5 वर्षांत केलेली कामे होती. मेसेजमधील सकारात्मक मुद्दे मी वाचून दाखवले. त्यातील शेवटच्या मुद्याशी मी सहमत नाही.

कोल्हापूरचा उपमर्द करणारे वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. शेवटी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...