Home /News /maharashtra /

Shocking ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, घटनेने अंबरनाथ हादरलं

Shocking ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, घटनेने अंबरनाथ हादरलं

youth killed by crushing head with stone: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

अंबरनाथ, 2 जानेवारी : अंबरनाथ येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (youth brutally murdered in Ambernath) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम येथील डीमसी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Youth murdered in Ambernath) डीएमसी कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात आज सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिसंकडून सुरू आहेत. हा तरुण कोण आहे? तो या परिसरात कशासाठी आला होता? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतक्या निर्घृणपणे कोणी आणि कशासाठी या तरुणाची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. वाचा : जवळच्या मित्रानेच केला खून, पार्टी सुरू असताना खुपसला खंजीर नाशिकमध्ये 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या नाशिकमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव या 22 वर्षीय युवकाची रात्रीच्या (20 डिसेंबर) सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक-कळवण राज्य महार्गालगत सार्वजनिक वाचनालयाजवळील बाभळीच्या झाडाजवळ झुडपांमध्ये प्रेत टाकून पळ काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस कर्मचारी घटनेचा पुढील तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन दिपकचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. दिपकची दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे कृत्य कुणी केलं आणि हत्येमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ambernath, Crime, Murder

पुढील बातम्या