यवतमाळ, 03 सप्टेंबर: गेल्या एक महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या दीर आणि भावजयीनं धक्कादायक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा शेवट (brother in law and sister in law commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांनी मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या महागाव ते माहूर दरम्यान धनोडा येथील एका पुलावरून नदी पात्रात उडी घेत आपलं जीवन संपवलं (commits suicide by jump into river) आहे. दरम्यान एक पुरूष आणि एका महिलेनं नदीत उडी घेतल्याचं काही जणांनी पाहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू आहे. हेमंत राजेंद्र चिंचोलकर (वय-31) आणि सोनाली संदीप चिंचोलकर (वय-28) असं आत्महत्या करणाऱ्या दीर भावजयीची नावं आहेत. वरोरा तालुक्यातील रहिवासी असणारे हेमंत आणि त्यांची वहिनी सोनाली मागील एक महिन्यांपासून बेपत्ता होते. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारही दिली होती. हेही वाचा- तरुणीला एकटे पाहून घरात शिरले दोघे अन् हातपाय बांधून तरुणीवर केला बलात्कार सध्या धनोडा येथील पैनगंगा नदी (Suicide in Vainganga River) दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान रात्री आठच्या सुमारास एका महिलेनं आणि पुरुषानं पुलावरून उडी घेतल्याचं काही प्रवाशांनी पाहिलं. त्यांनी त्वरित याची माहिती धनोडा येथील रहिवाशांना दिली. घटनेची माहिती मिळताच काही गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच काहींनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेही वाचा- हुंड्यासाठी केली 2 लग्न, लाटले लाखो रुपये; दुसऱ्या बायकोनं फोडलं बिंग यावेळी पोलिसांना पुलावर पर्स, चपला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एटीएम कार्ड आढळलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित दीर भावजयीनं नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.