Home /News /maharashtra /

घरात घुसून मुलीचं तोंड दाबलं अन् चिरला गळा; साताऱ्यात एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

घरात घुसून मुलीचं तोंड दाबलं अन् चिरला गळा; साताऱ्यात एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

हत्या झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाटण तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. (File Photo)

हत्या झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाटण तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. (File Photo)

Murder in Satara: साताऱ्यातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (one sided love) भरदिवसा अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा गळा चिरला (slit throat) आहे.

    सातारा, 24 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होतं आहे. अलीकडेच चंद्रपुरातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (Murder in one sided love) तरुणीला भररस्त्यात भोकसून तिची निर्घृण हत्या (Brutal murder by stabbing with knife) केली होती. ही घटना ताजी असताना, साताऱ्यात (Satara) या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील एका तरुणाने भरदिवसा अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा गळा चिरला (slit throat) आहे. यानंतर आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrest) केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हत्या झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाटण तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. तर 20 वर्षीय आरोपी अनिकेत मोरे हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी मृत तरुणीच्या मागे लागला होता. दरम्यान त्याने मृत मुलीच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी देखील घातली होती. पण मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिला होता. मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपीच्या मनात मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल रोष वाढला होता. यातूनच आरोपीनं संबंधित अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे. हेही वाचा-लेकीच्या Admission साठी महिलेला करावं लागलं हे काम; मुख्याध्यापकाचा कांड उघड नेमकं काय घडलं? गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत मुलगी आपल्या घरात टीव्ही बघत बसली होती. तर तिची तीन वर्षांची लहान बहिणी अंगणात खेळत होती. यावेळी मृत मुलीची आईही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीला काही कळायच्या आत आरोपीनं तिचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यावरून धारदार चाकू फिरवला. हेही वाचा-मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार थंड डोक्याने केलेल्या या हल्ल्यानंतर पीडित मुलगी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर संशयित आरोपी अनिकेत स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन हजर राहिला. तसेच त्याने संबंधित मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Satara

    पुढील बातम्या