• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • लेकीच्या School Admission साठी महिलेला करावं लागलं हे काम; Video व्हायरल होताच मुख्याध्यापकाचा कांड उघड

लेकीच्या School Admission साठी महिलेला करावं लागलं हे काम; Video व्हायरल होताच मुख्याध्यापकाचा कांड उघड

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लेकीला शाळेत प्रवेश मिळवून (School Admission) देण्यासाठी गेलेल्या एका महिलेला मुख्याध्यापकानं भलतंच काम करायला लावलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापकाचा कांड उघडकीस आला आहे.

 • Share this:
  बंगळुरू, 23 सप्टेंबर: लेकीला शाळेत प्रवेश मिळवून (School Admission) देण्यासाठी गेलेल्या एका महिलेला मुख्याध्यापकानं मसाज करायला लावल्याची (forced to do massage) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय (Beauty parlor business) असल्याचं कळल्यानंतर मुख्याध्यापकानं तिला मसाज करायला भाग पाडलं आहे. पीडित महिलेनंही मुख्याध्यापकाच्या दबावाला बळी पडत त्याचा मसाज करून दिला आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मुख्याध्यापकाचा कांड उघडकीस आला आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई करत मुख्याध्यापकाला निलंबित केलं आहे. लोकेशप्पा असं निलंबित केलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. तो बंगळुरू महापालिकेच्या कोदंडरामपुरा परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने अशाप्रकारचं कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील लोकेशप्पाच्या अनेक तक्रार महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. पण प्रशासनाने त्याच्या कृत्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं आहे. हेही वाचा-पुणे: सायबर कॅफेत जाताना तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह लोकेशप्पाने आपण संबंधित महिलेला मसाज करायला सांगितलं असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी लोकेशप्पाच्या चौकशी करण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाचे विशेष आयुक्त शंकर बाबू रेड्डी यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलाही ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असून ती आपल्या मुलीला प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेली होती. दरम्यान ती अॅडमिशनच्या निमित्ताने मुख्याध्यापक लोकेशप्पाला भेटली होती. हेही वाचा-मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार यावेळी मुख्याध्यापक लोकेशप्पाने पीडित महिलेला तुम्ही व्यवसाय काय करता असं विचारलं होतं. यावेळी महिलेनं आपण ब्युटी पार्लर चालवतो असं सांगितलं होतं. हे ऐकल्यानंतर लोकेशप्पाने तिला मसाज करायला सांगितलं. हे ऐकल्यानंतर महिलेलाही धक्काच बसला होता, मात्र दबावापोटी तिने मसाज करून देण्यास सहमती दर्शवली. लोकेशप्पाने शाळेतील सगळ्या शिक्षकांना बाहेर जायला सांगून एका वर्गात पीडित महिलेला बोलावून तिच्याकडून मसाज करून घेतला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: