मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Akola: टोळक्याने भररस्त्यात तरुणीचा 'बुरखा' उतरवत प्रियकराला बेदम मारलं, संतापजनक VIDEO व्हायरल

Akola: टोळक्याने भररस्त्यात तरुणीचा 'बुरखा' उतरवत प्रियकराला बेदम मारलं, संतापजनक VIDEO व्हायरल

Crime in Akola: अकोला जिल्ह्यातील गायगाव याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीनं 'बुरखा' परिधान (Girlfriend wear burkha) केल्याच्या कारणातून एका टोळक्याने प्रियकराला बेदम मारहाण (Boyfriend beaten up by mob) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

अकोला, 13 डिसेंबर: अकोला (Akola) जिल्ह्यातील गायगाव याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीनं 'बुरखा' परिधान (Girlfriend wear burkha) केल्याच्या कारणातून एका टोळक्याने प्रियकराला बेदम मारहाण (Boyfriend beaten up by mob) केली आहे. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जोडप्याला शिवीगाळ करत, तरुणीला भररस्त्यावर 'बुरखा' काढायला भाग पाडलं आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन विकृतांना अटक (2 accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित प्रेमीयुगुल शनिवारी दुपारी अकोल्यावरून गायगाव येथील गणपती मंदिराच्या दिशेनं निघालं होतं. यावेळी दुचाकीवरील प्रियकराने आपल्या तोंडाला स्कार्फ बांधला होता. तर प्रेयसीनं बुरखा परिधान केला होता. गायगाव येथील ऑईल डेपोसमोरून जात असताना, हे जोडपं एका टोळक्याच्या निदर्शनास आलं.

हेही वाचा-नागपुरात हायप्रोफाइल SEX रॅकेटचा पर्दाफाश; सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

यावेळी विकृत टोळक्याने कोणतंही कारण नसताना, दादागिरी करत जोडप्याची दुचाकी आडवली. कुठे जात आहात? तुमचं नाव काय? कुठे राहाता? अशा विचारपूस करत त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर आरोपींनी बुरख्यातील मुलीचा चेहरा पाहायचा असल्याचा हट्ट धरला. त्यासाठी आरोपींनी जबरदस्ती करायला सुरुवात केली. यामुळे प्रियकराने टोळक्याचा विरोध केला, यामुळे चवताळलेल्या विकृत टोळक्याने प्रियकराला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मोलकरणीचे कपडे काढले, नंतर चप्पलनं मारहाण; 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक

यावेळी प्रेयसीनं रस्त्यावर गुडघे टेकून हात जोडून विनवणी करत होती. तरीही टोळकं प्रियकराला मारहाण करत होतं. यावेळी आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतं. वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आरोपींच्या दहशतीपुढे अखेर पीडित तरुणीला आपला बुरखा काढावा लागला. ही सर्व घटना मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

First published:

Tags: Akola, Crime news