• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास, पाहा VIDEO

जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास, पाहा VIDEO

Robbery in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात भामट्यांनी एटीएम मशीन (Robbery on ATM machine) फोडून लाखो रुपये लंपास (Robbed lakhs of rupees) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:
अहमदनगर, 10 ऑक्टोबर: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात भामट्यांनी एटीएम मशीन (Robbery on ATM machine) फोडून लाखो रुपये लंपास (Robbed lakhs of rupees) केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून एटीएम फोडलं ( ATM blown up with gelatin sticks) आहे. ही घटना आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, डिवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावात घडली आहे. लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा इंडिकॅशचं एटीएम आहे. दरोडेखोरांनी हे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडलं आहे. यानंतर दरोडेखोरांनी एटीएममधील 4 लाख 5 हजार रूपयांची रोकड लुटून नेली आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे. एटीएम फोडल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे आणि डिवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच चोरट्यांचा शोध लावण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली सापडतात का याचा तपास पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published: