• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • NEET 2021 Leaked: NEET पेपर लीक झाल्याचं उघड; जयपूरमधून 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

NEET 2021 Leaked: NEET पेपर लीक झाल्याचं उघड; जयपूरमधून 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

यासंबंधीचे पुरावे शोधण्यात आता पोलीस शोधत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: NEET 2021 परीक्षेचा पेपर फुटल्याची (NEET 2021 Leaked) चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी याबद्दल चौकशी (NEET Paper Leaked Confirm) करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आता NEET पेपर फोडल्याच्या संशयातून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यासंबंधीचे पुरावे शोधण्यात आता पोलीस शोधत आहेत. पेपर दुपारी 2 वाजता सुरू झाला आणि तो 2:30 वाजता व्हॉट्सअॅप द्वारे लीक झाला. जयपूरमधील राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (RIET) NEET परीक्षा केंद्रातून पेपर लीक झाला.उमेदवार धनेश्वरी यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली तर इतरांना रिमांडवर घेण्यात आले. हे वाचा - AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपूर इथे या पदांसाठो नोकरीची संधी; 67000 पगार कोचिंग डायरेक्टर नवरत्न स्वामी यांनी संपूर्ण पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले. 35 लाख रुपायी देऊन हा पेपर लीक करण्यात आला असे आरोप लावण्यात आले आहेत. अधिकारी म्हणाले होते.... अधिकाऱ्यांनी या पेपर फुटल्याचा बातमीला खोटं सांगितलं होतं.  जेव्हा न्यूज 18 डॉट कॉमने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अशा कोणत्याही तक्रारी आल्याचं नाकारलं  आणि सांगितलं होतं की या अफवा आहेत. "
  Published by:Atharva Mahankal
  First published: