मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संतापजनक! बुलडाण्यात पोटचा लेकच बनला नराधम; जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक! बुलडाण्यात पोटचा लेकच बनला नराधम; जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

शेगाव, 04  ऑक्टोबर: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका 22 वर्षीय तरुणीनं आपल्या जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न (Attempt to rape on mother) केला आहे. पीडित आईनं शहर पोलीस ठाण्यात लेकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

आरोपी तरुण हा पीडित महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. 22 वर्षीय आरोपी तरुणाला दारू पिण्याचं व्यसन असून तो कधी पीडितेच्या घरी राहतो, तर कधी पीडित महिलेच्या पहिल्या पतीकडे राहत असतो. 30 सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा दारू पिऊन फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी तो आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. पण आईनं त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीनं आपल्या जन्मदातीलाच शिवीगाळ केली.

हेही वाचा-बॅडमिंटन कोचकडून 14 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील संतापजनक प्रकार

आरोपी मुलाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला आपल्या मुलीला घेऊन दुसरीकडे झोपायला गेली. यानंतर रात्री आरोपी पीडितेच्या घरातून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी तरुण पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी आरोपीनं आपल्या जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नराधमाने आईला रबरी पाईपने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

हेही वाचा-नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मुलाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी 22 वर्षीय आरोपी तरुणाच्या विरोधात मारहाण, विनयभंगासह विविध कलामाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Rape