भिवंडी, 20 नोव्हेंबर : ‘जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसीप्लेन चाहिये, में सीनसिअर मिनिस्टर हु’ असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर कार्यक्रमातच एका आयएस अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. दीपक केसरकरांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करीत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून चांगलेच फैलावर घेतले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर कार्यक्रमात IAS अधिकाऱ्याला झापलं pic.twitter.com/xm5RIn0CWE
— News18Lokmat (@News18lokmat) November 20, 2022
‘जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारीने डिसीप्लेन समजना चाहिये, हमे पता है, की तुम्हे लँगवेज का प्रॉब्लेम है. मै आखरी बार वार्निंग दे रहा हू, असे बोलून किमान मंत्र्यांचे भाषण सुरू असताना तरी बडबड करू नका ? असे सांगत सर्वासमोरच व्यासपीठावर केसरकरांनी IAS अधिकारी प्रत्युष पांडा यांना झापलं. (नारायण राणेंच्या मुलाने राज्यपालांना सुनावले खडेबोल, म्हणाले….) शासकीय शाळेतील पटसंख्या कमी असल्यावर शाळा बंद होणार अशा बऱ्याच अफवा उडवले जातात कुठलीही शाळा बंद होणार नाही. एखाद्या गोष्टीवर चर्चा सुरू झाली की तो निर्णय झाला असे गृहीत धरणे फार चुकीचे आहे. यावर उपाय योजना केली गेली पाहिजे लोकांशी बोलून पटसंख्या कशी वाढवता येईल, यावर चर्चा झाली पाहिजे मुलांचे शिक्षण बळकट कसे करता येईल यावर विचार झाला पाहिजे आणि एखादा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी बोलूनच तो निर्णय घेतला जाईल, असंही दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. केसरकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका भिवंडीत प्रथमच जिल्हा परिषद माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशनचे उद्घाटन काल्हेर येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाले. परंतु या ठिकाणी पोहोचण्याकरता मंत्री दीपक केसरकर यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागला. ( ‘शिवाजी तर जुने झाले आहे’, राज्यपाल कोश्यारींचं पुन्हा बोलले ) त्यामुळे आपल्या भाषणात शेवटी त्यांनी म्हटलंच की, ‘हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा ज्या ठिकाणी हा उपक्रम प्रथम राबवला जात आहे. मात्र वाहतूक कोंडीचा बाबतीत आमदार शांताराम मोरे त्यांनी विशेष सुधारणा करण्याची गरज आहे. तसंच ही बाब मी मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील टाकणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.