यवतमाळ, 08 सप्टेंबर : यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस गेल्या काही दिवसांत वाढला आहे. अशाच एका टोळीने एका बारमध्ये हवेत गोळीबार करीत गोंधळ घातला. (Yavatmal crime) शिवाय बार मालकाला बेदम मारहाण करीत त्यांचेवर काचेच्या शिश्या व ग्लास भिरकावून तोडफोड केली. गुंडगिरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
छोटी गुजरीत असलेल्या बारमध्ये दारू पित असलेल्या सात गुंडांना बार चालक लकी जयस्वाल यांनी बार बंद करण्याची वेळ झाल्याचे सांगून, बिलाचे पैसे मागितले यावरून गुंडांच्या टोळीने लकी जयस्वाल यांचेवर जीवघेणा हल्ला चढवून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिसांना वेळीच सूचना दिल्यानंतरही पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने आरोपी पसार होण्यात यशस्वी झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. शहरात गुंड टोळींमध्ये सशस्त्र हल्ले व त्यांचा हैदोस वाढल्याने नागरिक दहशतीत आहे.
हे ही वाचा : VIDEO : डान्स करताना अचानक खाली कोसळला तरुण, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
विविध कारणांवरून यवतमाळ चर्चेत
राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. यवतमाळ (Yavatmal ) जिल्ह्यामध्ये पावसामुळे विदारक दृश्य समोर आले आहे. जिल्ह्याच्या माळकिन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केल्या जात आहे.
महागाव तालुक्यातील माळ किन्ही येथील अविनाश कलाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह माळ किन्ही येथे आणला. मात्र दिवसभर पाऊस सुरू होता. अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेले धनशेड हे नाल्याच्या पैल तिरी आहे. शिवाय अंत्यसंस्कारासाठी इतरत्र जागा नाही. त्यामुळे नाल्याच्या पुरातून वाट काढत दहन शेडमध्ये अंत्य संस्कार करण्याची वेळ आली.
हे ही वाचा : ‘मग सुरक्षा काढून टाका’, पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं
नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून खांद्यावर घेऊन एकमेकांच्या साह्याने नाल्याच्या पुरातून छातीपर्यंत असलेला पाण्यातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. विकासाच्या नावावर उड्या मारून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

)







