श्रीनगर, 8 सप्टेंबर: डान्स करताना मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा एका तरुणीचा डान्स करताना मृत्यू झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. हा तरुण माता पार्वतीचा गेटअप करून डान्स करत होता. डान्स करता करता हा तरुण खाली कोसळला ती परत उठलाच नाही. जम्मू काश्मीरच्या बिश्नेह तहसील इथे मंगळवारी ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू-काश्मीरमधील एका कलाकाराचा स्टेज परफॉर्मन्सदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जागरणाच्या आधी शिव आणि पार्वती यांच्यावरील नृत्यनाट्य सादर केले जात होते. या कार्यक्रमात कलाकार सादरीकरण करत होते. त्यावेळी तरुण डान्स करत असताना अचानक खाली कोसळली. 20 वर्षीय योगेश गुप्ता स्टेजवर परफॉर्म करत असताना डान्स करताना पडला. डान्सची ही स्टेपही छान आहे असे म्हणत लोकांनी टाळ्या वाजवल्या पण तो परत उठलाच नाही. योगेशला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने योगेश गुप्ता यांचा स्टेजवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तर प्रदेशात गणेश चतुर्थीदरम्यान धार्मिक कार्यक्रम एका कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.