मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मग सुरक्षा काढून टाका', पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं

'मग सुरक्षा काढून टाका', पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं

'मग सुरक्षा काढून टाका', पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं

'मग सुरक्षा काढून टाका', पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं

यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 08 सप्टेंबर : पोलिसांचा एवढाच राग राग करताय ना, मग तुम्ही खासदार आहात, केंद्रात तुमचे सरकार आहे, मग पोलिसांची सुरक्षा काढून टाका, कशाला पोलिसांची सुरक्षा घेता?' असा सवाल करत पोलिसांच्या कुटुंबीयांना खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्याविरोधात निदर्शनं केली.

अमरावतीतील कथित लव्ह जिहार प्रकरणावरून शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीच अपहरण झाल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत सोबत हुज्जत घालून राडा केला होता.

पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राना यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

(अविनाश भोसलेंना दिलासा, मुलाची जामिनावर सुटका)

यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

('तर थू आहे तुमच्या डिपार्टमेंटवर', नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, VIDEO)

तसंच, नवनीत राणा या खासदार आहे, केंद्रामध्ये त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे. त्यांना पोलिसांची सुरक्षा घेण्याचा कोणताच अधिकार नाही. तुमच्या पाठीमागे फिरणार हे शासकीय पोलीस कर्मचारी आहे. कोणतेही सण उत्सवात ते आमच्यासोबत नसता, ते तुमच्या सुरक्षेत सोबत असतात. आमचे पोलीस हे मेहनत करून पोलीस दलात पोहोचले आहे. तुमच्या सारखे राशन वाटून मोठे झाले नाही, अशी टीका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी वर्षा भोयर यांनी केली.

First published: