PSI भावांचा दुर्देवी मृत्यू! हृदयविकाराने आधी गेला नितीन तर आता कोरोनामुळे सचिन

PSI भावांचा दुर्देवी मृत्यू! हृदयविकाराने आधी गेला नितीन तर आता कोरोनामुळे सचिन

मुंबईतील विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय- 41) यांचं कोरोनामुळे निधन झालं

  • Share this:

मुंबई, 10 जुलै: मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची आकडेवारी सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. त्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय- 41) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

हेही वाचा...सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

सचिन पाटील हे मूळचे उदगावचे (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) रहिवासी होते. सचिन पाटील यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हृदयविकाराने आधी नितीन तर आता कोरोनामुळे गेला सचिन

धक्कादायक म्हणजे सचिन पाटील आणि नितीन पाटील हे दोघे उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना नितीन पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता सचिन पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. सचिन पाटील हे मुंबईतील विक्रोळी स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.

हेही वाचा... विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

सचिन पाटील यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. नंतर गेल्या चार दिवसांपासून ताप होता. त्यांना ठाणे येथील गुरुनानक रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांच्या प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार होती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, प्लाझ्मा थेरपी करण्याआधीच सचिन पाटील यांनी प्राणज्योत मालवली. दोन्ही PSIभावांचा दुर्देवी मृत्यूने पाटील कुटुंबींयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 10, 2020, 9:03 PM IST

ताज्या बातम्या