मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिंदे सरकारला घरचा अहेर, मंत्री दर्जाच्या नेत्याने APMC मार्केट पाडले बंद

शिंदे सरकारला घरचा अहेर, मंत्री दर्जाच्या नेत्याने APMC मार्केट पाडले बंद

 राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून,अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही.

राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून,अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही.

राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून,अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

नवी मुंबई, 01 फेब्रुवारी : माथाडी कामगारांच्या प्रश्नी भाजपचे नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील APMC मार्केट रात्रीपासूनच बंद पडले आहे. त्यामुळे पहाटे आलेल्या भाजीविक्रेते आणि स्थानिकांना याचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, मंत्री दर्जाचे नरेंद्र पाटील यांनी बंद पुकारून सरकारला घरचा अहेर दिला आहे.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले आहे. रात्रीपासूनच APMC मार्केट चे संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला व्यापारांनी पाठिंबा दिला असून,यात व्यापारी ही सहभागी झाले असल्याचे चित्र मार्केट मध्ये दिसत आहे.

(शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांना मोठा दिलासा; जावई विजय झोल यांना अटकपूर्व जामीन मंजूर)

राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून,अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याची माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली. जर यातून काही मार्ग निघाला नाही आणि सरकार जागे झाले नाही, तर राज्यातल्या संपूर्ण APMC मार्केट अनीच्छित काळासाठी बंद केल्या जातील असा इशारा ही नरेंद्र पाटील यांनी दिला.

मात्र आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून, कामगार सकाळी 10 वाजता माथाडी भवनमध्ये एकत्र जमून पुढील रणनीती ठरवतील. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल त्यावेळी समजेल. मात्र आता तरी मार्केट बंद पडलेले आहे.

वाचा - शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवली, पुरस्कारचं स्वरुपही बदललं

यावेळी नरेंद्र पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करताना, माथाडी बोर्डात काही खंडणीखोर घुसले असून त्यांना पोलीस सपोर्ट करतात. राज्य सरकारला मोठ्या प्रकल्पात जास्त रस आहे. मात्र माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात नाही. त्यामुळे माथाडी कामगार देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे.आताच्या राज्य सरकारकडे आम्ही मागणी केली, मात्र ती पूर्ण होत नाही. त्यामुळे आज आम्ही बंद पुकारला असून याला राज्य भरातील अनेक व्यापारी वर्गाचा पाठिंबा मिळत आहे, असंही नरेंद्र पाटील म्हणाले.

First published:

Tags: नवी मुंबई