जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाणे : मावशीची हत्या करून पुरावेही केले नष्ट; पावणेचार वर्षांनी महिलेला मिळाली मोठी शिक्षा 

ठाणे : मावशीची हत्या करून पुरावेही केले नष्ट; पावणेचार वर्षांनी महिलेला मिळाली मोठी शिक्षा 

ठाणे : मावशीची हत्या करून पुरावेही केले नष्ट; पावणेचार वर्षांनी महिलेला मिळाली मोठी शिक्षा 

2018मध्ये एका वृद्ध मावशीचा खून (Murder in Thane) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला भाचीला जन्मठेपेची (Life Iimprisonment) शिक्षा सुनावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 15 मे : 2018मध्ये एका वृद्ध मावशीचा खून (Murder in Thane) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला भाचीला जन्मठेपेची (Life Iimprisonment) शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. शोभा गणेश कुलकर्णी असे 75 वर्षीय खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर स्वप्ना सुधीर कुलकर्णी असे 39 वर्षीय आरोपी भाचीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी याप्रकरणी निकाल दिला. 2018मध्ये भाचीने केला मावशीचा खून - प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा कुलकर्णी यांच्यातजोरदार वाद झाला होता. 6 ऑक्टोबर 2018ला ही घटना घडली होती. याचवेळी संतापात भांडणादरम्यान स्वप्ना हिने किचनमधील चाकूने तिच्या मावशी शोभा यांच्या डोक्यावर आणि डोळ्यावर हल्ला केला. यानंतर आरोपी भाचीने भिंतीवरील रक्ताचे डाग पुसले. तसेच स्वत:च्या अंगावरील कपडेही वाशिंग मशीनमध्ये धुतले. याप्रकारे तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर घटनेची माहिती मिळाल्यावर राबोडी देवी पोलीस घटनास्थळी हजर झाले. यावेळी आरोपी भाचीने मावशी पलंगावरुन खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला असे सांगितले. हेही वाचा -  14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं

तर पोलिसांनी तपासणी केली असता, या वृद्धेच्या डोक्यावर जखमा आढळल्या. तसेच घरातील भिंतीवरही रक्ताचे डाग आढळले. यानंतर ७ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर आलेल्या अहवालात वृद्ध महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर राबोडी देवी पोलिसांनी आरोपी स्वप्ना हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.

मावशीच्या खुनासाठी धरले जबाबदार - 

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे तपासले. प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता तरी पुराव्यांच्या आधारावर आरोपी स्वप्ना हिला मावशीच्या खूनासाठी जबाबदार धरण्यात आले. तिला खूनाच्या आरोपात जन्मठेप तसेच दहा हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कैैदेची शिक्षा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder , thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात