Home /News /maharashtra /

14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं

14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं

 मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.

मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.

मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.

    नितीन नांदरूकर, प्रतिनिधी जळगाव, 14 मे : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (pachora) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार (gang-raped ) केल्याची धक्कादायक घटना प्रकार आज समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिनही नराधमाना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे तर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात (Pimpalgaon Hareshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील 20 ते 25 जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. (अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं) गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात 5 ते 6 जणांनी 14 वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला.  पीडित मुलीवर पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले. (माझी गर्लफ्रेंड बिल्डिंगमध्ये अडकली होती; Video कॉलवर तिला धीर देत होतो, पण...) अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता पीडितेनं सगळी हकीकत सांगितली. हा प्रकार उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुबीयांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.  पीडित मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या  प्रकरणी पिंपळगाव पोलिसांत पोक्सो कायद्यांसह 3 बलात्कारी नराधमावर सामूहिक बलात्काराचा गुन्ह्याही दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या