कराड, 28 सप्टेंबर: कराड येथील वाखाण भागात शनिवारी एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या (brutal murder by slit throat) केल्याची घटना उघडकीस आली होती. संबंधित महिलेची इतकी निर्दयीपणे हत्या नेमकी कोणी केली याचा पेच पोलिसांसमोर होता. पण पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, बहिणीनेच ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनेच बहिणीला संपवलं असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक (Accused sister arrest with her boyfriend) केली आहे. या घटनेचा पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.
ज्योती सचिन निगडे (वय-27) आणि सागर अरुण पवार (वय-28) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी कराडनजीक असणाऱ्या मलकापूर येथील रहिवासी आहेत. तर उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर असं हत्या झालेल्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे, त्या कराड येथील वाखाण येथील रहिवासी होत्या. आरोपी बहीण ज्योती आणि तिचा प्रियकर सागर यांनी शुक्रवारी शेतातून वाट काढत उज्ज्वला यांच्या घरात शिरले होते. त्यानंतर उज्ज्वला यांनी मारहाण करून त्यांनी तिची निर्घृण हत्या केली आहे.
हेही वाचा-गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न; बायकोच्या अंगाला अंगारा लावला पण..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उज्ज्वला या कराड शहरातील वाखाण रस्त्यालगत एकट्या राहत होत्या. मृत उज्ज्वला याचं आरोपी बहीण ज्योती हिचा नवरा सचिन याच्यासोबत अनैतिक संबंध (Murder in immoral relationship) होते. आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून ज्योतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी ज्योतीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-रात्री मित्रासह पत्नीच्या खोलीत शिरला अन्...; 22वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस
नेमकी हत्या कशी घडली?
आरोपी बहीण ज्योती आणि तिचा प्रियकर अरुण हे शुक्रवारी शेतातून वाट काढत उज्ज्वलाच्या घरी पोहोचले होते. यावेळी आरोपी ज्योतीने आपल्या बहिणीसोबत वाद घालायला सुरुवात केली. माझ्या पतीसोबत अनैतिक संबंध ठेवतेस, असं म्हणत आरोपी ज्योतीने उज्ज्वला यांना मारहाण करायला सुरुवात केली. मृत उज्ज्वला यांच्यासोबत झालेल्या झटापटीनंतर आरोपी अरुण आणि ज्योतीने तिच्यावर चाकूने सपासप वार करत तिचा गळा चिरला. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी त्याच वाटेनं पुन्हा नदी काठावर आले आणि तेथून पसार झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Satara