मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

12 वर्षांनी लहान तरुणावर विवाहितेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा

12 वर्षांनी लहान तरुणावर विवाहितेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा

Murder in Latur: लातूरमधील एका विवाहित महिलेनं कट रचून आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder by wife) केली आहे.

Murder in Latur: लातूरमधील एका विवाहित महिलेनं कट रचून आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder by wife) केली आहे.

Murder in Latur: लातूरमधील एका विवाहित महिलेनं कट रचून आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder by wife) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

लातूर, 20 डिसेंबर: लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शिवणी या ठिकाणी एका महिलेनं कट रचून आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder by wife) केली आहे. आरोपी महिलेनं आपला 21 वर्षीय प्रियकर आणि गावातील अन्य एक जणाच्या मदतीने पतीला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपींनी मृत तरुणाला दारू पाजून त्याची गळा आवळून हत्या केली आहे. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या घटनेचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेला आणि तिच्या एका साथीदाराला अटक (2 Accused arrested) केली आहे. आरोपी महिलेचा प्रियकर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

किशोर विठ्ठल सुतार असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते शिवणी येथील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी मनीषा, प्रियकर अविनाश नवनाथ गुरने (21) आणि साथीदार धनाजी सूर्यभान वाघमारे (35) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किशोर याचं मनीषा हिच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला तीन मुलं देखील झाली. पण पती किशोर याला दारूचं व्यसन असल्याने मनीषा वैतागली होती.

हेही वाचा-पतीने कुऱ्हाडीने घाव घालत केलं रक्तबंबाळ; डोळ्यादेखत पत्नीनं तडफडत सोडला प्राण

दरम्यान आरोपी मनीषा हीचं गावातील 12 वर्षींनी लहान असणाऱ्या अविनाशसोबत सूत जुळलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते. याचा संशय किशोरला आल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अनैतिक संबंधात येणारा अडसर कायमचा दूर करण्यासाठी मनीषा हिने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी प्रियकर अविनाशची मदत घेतली. पण एकट्याला ही हत्या करता येणार नाही. म्हणून आरोपींनी गावातील अन्य एक तरुण धनाजी याला आपल्या कटात सामावून घेतलं.

हेही वाचा-जडीबुटीच्या उपचारासाठी विवस्त्र केलं अन्..; तरुणासोबत घडलेला प्रकार वाचून हादराल

ठरलेल्या प्लॅननुसार आरोपींनी घटनेच्या दिवशी किशोरला शुद्ध जाईपर्यंत दारू पाजली. शुद्ध हरपताच आरोपी किशोर याला गावापासून अर्धा किलोमीटर लांब एका शेतात घेऊन गेले. या ठिकाणी आरोपींनी मफलरने गळा आवळून किशोरची हत्या केली. यानंतर मृतदेह जवळच्याच एका शेतात टाकून पळ काढला. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी मनीषासह साथीदार धनाजी याला अटक केली आहे. प्रियकर अविनाश फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Latur, Murder