मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वीज कोसळून 110 शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू, गडचिरोलीतील धक्कादायक घटना

वीज कोसळून 110 शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू, गडचिरोलीतील धक्कादायक घटना

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात.

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात.

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात.

गडचिरोली, 10 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. गडचिरोलीमध्ये (gadchiroli) पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यातील कोरची तालुक्यात जंगलामध्ये वीज कोसळून (lightning strike) शंभरहून अधिक शेळ्या (goats) आणि मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शेळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरची तालुक्यात  मसेली गावानजीक असलेल्या सावली इथं ही घटना घडली आहे. ही घटना मध्य रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली.  जंगलात वीज कोसळून शंभराहून अधिक शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

IND vs ENG : टीम इंडियाचे खेळाडू का घाबरले? कार्तिकने सांगितली Inside Story

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात. यंदा हे मेंढपाळ दोन डेरे घालून वसलेले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात तर दुसरा डेरा सावली परिसरात आहे. दोन्ही डेऱ्यांमध्ये 7-8 परिवारांचा समावेश आहे.

'खाईल तर तुपाशी', वाईन शॉप फोडायचा अन् फक्त ब्रँडेड बाटल्या चोरायचा, पण...

मध्य रात्री 1 वाजेच्या सुमारास सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. अशातच अचानक डेऱ्याजवळच वीज कोसळल्याने जवळपास 110 शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्या. यामुळे मेंढपाळांचे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos