Home /News /maharashtra /

3 सख्ख्या भावंडावर काळाचा घाला, टाकीवर चढून नातेवाईकांच शोले स्टाईल आंदोलन

3 सख्ख्या भावंडावर काळाचा घाला, टाकीवर चढून नातेवाईकांच शोले स्टाईल आंदोलन

शॉक लागून विहिरीत पडलेल्या आपल्या भावाला वाचवताना तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जालना, 20 नोव्हेंबर: शॉक लागून विहिरीत पडलेल्या आपल्या भावाला वाचवताना तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे ही दुर्देवी घटना घडली. मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केलं आहे. हेही वाचा...धक्कादायक! BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं पळसखेडा येथील ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव ही तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मोटर चालू करताना एकला जबरदस्त शॉक बसला. तो विहिरीत पडला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी इतर दोघा भावांनी देखील विहिरीत उडी घातली. यघटनेत तिघा भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, या तिन्ही भावांच्या मृत्यूला वीज वितरण कंपनी जबबदार असलयाचा आरोप करीत सचिन साबळे आणि पंकज पिंपळे या दोन तरुणांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या एक तासापासून हे आंदोलन सुरू असून पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी जाऊन त्या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विहिरीत तरंगत होता तिघांचा मृतदेह... ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव तिघे भाऊ रात्रीपासून घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. शेतातील विहिरीत तिघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेनंतर पळसखेडा गावावर शोककळा पसरली. घटनास्थळी राजूर पोलिस पंचनामा केला. यावेळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होता. हेही वाचा...कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबई रेल्वे व विमान सेवा बंद होणार का? काय आहे सत्य तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं ज्ञानेश्वरच लग्न तिन्ही भावंडामध्ये थोरला असलेला ज्ञानेश्वर (28) याचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पतीच्या निधनाचं वृत्त समजताच त्याच्या नवविवाहित पत्नीनं मोठा आक्रोश केला. ज्ञानेश्वरचे दोघे भाऊ औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावी आले होते. गावाकडे तिघे भाऊ शेतीचं काम करत होते.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Marathwada

पुढील बातम्या