मराठी बातम्या /बातम्या /देश /

2 घरांमध्ये एकामागोमाग स्फोट आणि भीषण अग्नितांडव, पूर्ण शहाराला हादरवून टाकणारा आगीचा LIVE VIDEO

2 घरांमध्ये एकामागोमाग स्फोट आणि भीषण अग्नितांडव, पूर्ण शहाराला हादरवून टाकणारा आगीचा LIVE VIDEO

ही आग फटाक्यांचा स्फोट झाल्यानं लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

    आग्रा, 18 ऑक्टोबर : शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे या नवरात्रीचा उत्साह सुरू असताना एक भीषम दुर्घटना घडली आहे. घरांच्या मधोमध स्फोटांचा जोरात आवाज आला आणि आगीचे लोळ उठले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरांमधून आगीच्या उंच ज्वाळा आणि धूर अगदी लांबपर्यंत दिसत असल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आणि पाहता पाहता आगीनं रौद्र रुप धारण केलं. ही आग किती भीषण आहे याचा अंदाज व्हिडीओमधून येऊ शकतो. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत जवळपास अनेक लोक अडकले होते. त्यापैकी 12 जणांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांना रेस्क्यू करून रुग्णालयात दाखल केलं जात असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे तातडीचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाचा-कारनं अचानक घेतला पेट आणि...पाहा मुंबईतील बर्निंग कारचा थरारक VIDEO ही आग फटाक्यांचा स्फोट झाल्यानं लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. अग्निशमन दलाकडून या आगीत आणखीन किती लोक अडकले आहेत याचा तपास सुरू आहे. आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक जण यामध्ये होरपळले. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरात घडली आहे. शाहगंज परिसरातील आजमपाडा परिसरात भरदुपारी अग्नितांडव झाला. ही आग वेगानं आजूबाजूच्या घरांमध्ये पसरायला लागली आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या