मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उच्चभ्रू वस्ती राहणी अन् काम लॅपटॉप चोरी, महिलेचा प्रताप पाहून पोलीसही हैराण

उच्चभ्रू वस्ती राहणी अन् काम लॅपटॉप चोरी, महिलेचा प्रताप पाहून पोलीसही हैराण

 ही महिला उच्चभ्रु वस्तीत वास्तव्याला असून तिच्यावर कोणी संशय घेत नसल्याने अशा प्रकारे चोरी करीत असल्याचं तपासात निष्पन्न झाले.

ही महिला उच्चभ्रु वस्तीत वास्तव्याला असून तिच्यावर कोणी संशय घेत नसल्याने अशा प्रकारे चोरी करीत असल्याचं तपासात निष्पन्न झाले.

ही महिला उच्चभ्रु वस्तीत वास्तव्याला असून तिच्यावर कोणी संशय घेत नसल्याने अशा प्रकारे चोरी करीत असल्याचं तपासात निष्पन्न झाले.

  • Published by:  sachin Salve

ठाणे, 17 नोव्हेंबर : ठाण्यातील (thane) घोडबंदर रोड इथल्या विजय सेल्स (vijay sales) या दुकानात दिवाळीनिमित्त (diwali) खरेदीकरीता झालेल्या गर्दीचा फायदा घेवून लॅपटॉप चोरी करणाऱ्या एका महिलेला कापुरबावडी पोलfसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही महिल्या उच्चभ्रू वस्तीत राहते, तिच्या या कृत्यामुळे पोलीसही हैराण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात म्हणजे, 3 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास विजय सेल्स या दुकानात दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर असलेल्या विविध ऑफर्समुळे खरेदीकरीता झालेल्या गर्दीचा फायदा घेवून या महिलेनं हात साफ केला. या महिलेने इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदी करण्याचा बहाणाकरून गर्दीचा फायदा घेत 99,999 रूपये किंमतीचा एक acer कंपनीचा लॅपटॉप, चोरी केला होता. त्यावरून विजय सेल्सने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारी महिला ही तिने परिधान केलेल्या कपड्यांवरून तसंच तिच्या बोलण्यावरून सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारी असावी असा संशय वाटत असल्याने तिच्याबद्दल माहिती मिळवणं कठीण होतं. पोलिसांनी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून प्राप्त मोबाईल क्रमांकाचं तांत्रिक विश्लेषण करून चोरी करणाऱ्या महिलेचा मोबाईल क्रमांक शोधला.

या संशयित मोबाईल क्रमांकाच्या कंपनीशी संपर्क साधून त्याबाबतची सर्व माहिती प्राप्त केली. त्यानंतर घटनास्थळाहून चोरी करणाऱ्या महिलेचं प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, तसंच गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर 11 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासले. अखेर सापळा रचून या महिलेला ताब्यात घेण्यात आलं.

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी

या महिलेनं लॅपटॉप चोरला आणि  कॅश काउंटरला जाते असं सांगून लॅपटॉपचा लॉक खोलून तो एका फ्रिजमध्ये ठेवला. नंतर लॅपटॉप बॅगेत घालून पळ काढते. यासारख्या आणखी दहा ते बारा दुकानातून सदर महिलेने चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेला 99,999 रूपये किंमतीचा लॅपटॉप, तसंच मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, कॅमेरा, ब्ल्यु टुथ डिव्हाईस, कपडे, राउटर, हेडफोन्स, घडयाळ, पोर्टेबल प्रिंटर, डिव्हीडी प्लेअर, व्हॅक्युम क्लिनर असा एकूण 2,65,033 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही महिला उच्चभ्रु वस्तीत वास्तव्याला असून तिच्यावर कोणी संशय घेत नसल्याने अशा प्रकारे चोरी करीत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: