• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याला ठाणे मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस जबाबदार? महत्त्वाची कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याला ठाणे मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस जबाबदार? महत्त्वाची कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती

फेरीवाले काही तरी विपरीत करु शकतील असा इशारा गेल्या एक वर्षांपासून पत्राद्वारे कासारवडवलीतील नागरिक देत होते.

  • Share this:
ठाणे, 3 सप्टेंबर : ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेला घातक हल्ला याला ठाणे महानगरपालिका आयुक्त (Thane Municipal Corporation Commissioner), सहाय्यक आयुक्त भाजीपाला विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली हे जबाबदार आहेत का? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा कासारवडवलीतील स्थानिक रहिवाशांनी आणि दुकानदारांनी वारंवार पत्र लिहून ठाणे महानगरपालिकेला या संदर्भात इशारा दिला होता की फेरीवाले काही तरी विपरीत करतील. त्याच्या आधीच त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा मोठा अनर्थ घडेल आणि नेमकं तसंच झालेलं आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. नागरिकांनी लिहिलेल्या पत्रे आणि इतर कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. या पत्रात तक्रारारदारांनी स्पष्टपणे हल्ल्याच्या घटना घडतायेत, घडतील असा उल्लेख केला होता. "तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे त्याच कासारवडवली भागातील साई कृष्णा प्रिमायसेस को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी यांनी तीन ते चार वेळा पत्रे लिहून फेरीवाल्यांच्या बाबतची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त फेरीवाला विभाग आणि ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी दिली होती. पण तरी देखील त्यांनी दुर्लक्ष केलं. 4 जानेवारी 2020, 29 जानेवारी 2020, 4 जानेवारी 2021 आणि 11 जानेवारी 2021 या तारखांना साई कृष्णा प्रिमायसेस को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी तसच यशराज सोसायटी आणि त्या भागातील दुकानदारांनी फेरीवाल्यांची दादागिरी आणि मुजोरी व गुंडगिरी बाबतीत पत्राद्वारे कळवले होते. कारण हे फेरीवाले सामान्य ठाणेकरांची, दुकानदाराची आणि सोसायटीतील सदस्यांशी गुंडगिरीमे वागायचे फेरीवाल्यांचा त्रास सर्वांना सहन करण्याच्या पलीकडे गेला होता. यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवला गेला होता. एवढेच काय तर ज्या ठिकाणी अमरजीत यादव याने कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला होता त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या एका इमारतीतील ग्राउंड फ्लोअरला एका डॉक्टरचे क्लिनिक आहे. या डॉक्टरला देखील फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. पण त्यानंतर देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी आपल्यावर असलेला वरदहस्त आणि आपल्यावर कोणी कारवाई करू शकत नाही याचा अति आत्मविश्वास कासारवडवली भागातील फेरीवाल्यांना आला होता आणि शेवटी जे घडू नये ते घडले. धक्कादायक ! बापानेच पोटच्या मुलीला दोन वर्षांत तीन वेळा विकले अमरजीत यादव याने कल्पिता पिंपळे आणि सुरक्षारक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात दोघांनाही आपली बोटे गमवावे लागलेत. आता या हल्ल्याला ठाणे महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त भाजीपाला विभाग आणि कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जबाबदार आहेत असं म्हटलं जातंय. याच मुळे त्यांच्यावर देखील कारवाई केली जावी असा सूर आता ठाणेकर आवळतायेत. रात्री-अपरात्री डान्स बार सुरू होते म्हणून किंवा छोट्या-मोठ्या घटनांमुळे ठाण्यामध्ये अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही जणांना निलंबित देखील केले गेले. मग इतकी मोठी घटना घडून गेली असताना देखील कोणावरच कशी कारवाई झाली नाही? याचे आश्चर्य ठाणेकर व्यक्त करतायेत. त्यामुळे नागरिकांना आशा आहे की, जर अशा पद्धतीच्या घटना टाळायच्या असतील तर फेरीवाल्यांना धडा शिकवणे गरजेचे आहेच. पण नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यांनादेखील धडा शिकवणे गरजेचे आहे. तरच अशा पद्धतीचे हल्ले आणि घटना पुन्हा होणार नाहीत असं मत ठाणेकरांनी व्यक्त केलंय.
Published by:Sunil Desale
First published: