मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विसारपूस केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विसारपूस केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विसारपूस केली.

ठाणे, 3 सप्टेंबर : माथेफिरू फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे (TMC officer Kalpita Pimple) यांची आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोनवरून विचारपूस केली. तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याने काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या. आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray calls Kalpita Pimple)

त्या माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता. यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पिता पिंपळे प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल उचलले असून खटला लढवण्याकरता विशेष वरीष्ठ वरीलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आरोपी अमरजीत यादवला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी घेतली होती पिंपळेंची भेट

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात भेट घेतली होती. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही भेट घेत राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

First published:

Tags: Thane, Uddhav thackeray