• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • धक्कादायक ! बापानेच पोटच्या मुलीला दोन वर्षांत तीन वेळा विकले

धक्कादायक ! बापानेच पोटच्या मुलीला दोन वर्षांत तीन वेळा विकले

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आपल्या पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:
नांदेड, 3 सप्टेंबर : नांदेडमध्ये पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री (Father sold daughter) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलगी नांदेड मधील हदगाव (Hadgaon Nanded) येथील रहिवासी आहे. तिने स्वत: हदगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून अल्पवयीन मुलीला आधी राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबाद इथून दोन वेळा विक्री झाली होती. औरंगाबादमध्ये गुन्हा घडल्याने हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपी आणि दलालाचा शोध पोलीस घेत आहेत. इंजेक्शन देत बेशुद्ध करुन गुरांची चोरी, लोणावळ्यातील धक्कादायक घटनेचा CCTV मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही नांदेडची आहे. या मुलीला वडिलांनी राजस्थानमधील कोटा येथील एका व्यक्तीला विकले. येथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे. मग आरोपीने या मुलीला पुन्हा आपल्या वडिलांकडे आणून सोडले. त्यानंतर पीडित मुलीला नंदूरबार येथे विकले. या ठिकाणी ज्या व्यक्तीला विक्री करण्यात आली होती त्याने पैसे न दिल्याने तिला पुन्हा घरी आणले. यानंतर आरोपी बापाने पुन्हा तिसऱ्यांदा मुलीची विक्री केली. तिसऱ्यांदा या मुलीची विक्री साताऱ्यात करण्यात आली. पीडित मुलीने फोनवरुन आपल्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Published by:Sunil Desale
First published: