मुंबई, 10 सप्टेंबर : शिवसेना नेते संजय राऊत(Shiv Sena Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ते सद्या आर्थररोड जेलमध्ये आहेत. मागच्या एक महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामीनासाठी भाऊ सुनिल राऊत आता अॅक्शन मोडवर आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते आहे. यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. संजय राऊत यांच्या प्रकरणाबाबत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागच्या कित्येक दिवसांपासून यांना पत्राचाळ प्रकरणाच्या आरोपाखाली संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. संजय राऊत यांनी दोन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता परंतु त्यांना अद्यापही जामीन मिळाला नाही. ईडीला त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे याबाबत कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भातच वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.
हे ही वाचा : मिशन 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील चार नेत्यांवर मोठी जबाबदारी! तावडेंचं प्रमोशन तर मुंडेंच..
संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी भावाला सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. ते काल रात्री उशीरा मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटालया बोलावले होते. त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली असे सुनील राऊत यांनी सांगीतले.
सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. त्यानंतर आता ते दिल्लीत पोहचले आहेत.
हे ही वाचा : VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य
31 जुलै 2022 रोजी ईडीने संजय राऊत यांच्या विक्रोळी येथील निवास्थानी धाड टाकली. विक्रोळी येथील निवास स्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी. यानंतर ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ संजय राऊत यांची चौकशी झाली. तब्बल 15 तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. यानंतर अखेरीस 1 ऑगस्ट रोजी साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली.