मुंबई, 16 सप्टेंबर : मागच्या कित्येक दिवसांपासून पत्रा चाळ कथित घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत अटकेत आहेत. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. (Sanjay Raut) या आदेशानंतर ईडी मुंबई सत्र न्यायालयात आपले उत्तर सादर केले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या जामीन अर्जास, ईडीनं स्पष्ट विरोध केला आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.
ईडी तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राऊत यांनी विशेष न्यायालयात केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा : 'कोण ओळखतं त्याला? तुमचा काळ संपलाय कारण..'; नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्यावतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
राऊत यांना सोमवारी (5 स्पटेंबर) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर बुधवारी (7 स्पटेंबर) राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती.
आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर सडकून टीका
शिवसेना आमदार आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. आदित्य ठाकरेंच्या स्वागतसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा : आता राष्ट्रीय पातळीवरही एकनाथ शिंदेंचीच 'हवा', 12 राज्यांच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
आदित्य ठाकरे यांना खासगी गाड्यांमधून Z सुरक्षा देण्यात आली. 'माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे असं यावेळी ते म्हणाले तर रिफायनरी बाबत दोघांची बाजू ऐकणार असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी बोलताना एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी सडकून टीका केली. हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरं जा असंही आव्हान त्यांनी यावेळी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED, ED (Enforcement directorate), Mumbai, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party)