Home /News /maharashtra /

आधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे

आधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

जळगाव, 26 डिसेंबर: पुण्यातील (Pune) भोसरी येथील भूखंडाच्या खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचनालयानं (ED) आपल्याला नोटीस पाठवली आहे. आपण या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे Eknath (Khadse) यांनी सांगितलं. एकनाथ खडसे जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 30 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हेही वाचा...महाविकास आघाडीनचं मराठा आरक्षणाचा खून केला, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. याआधीही आपण सर्व तपास यंत्रणांना आणि चौकशी आयोगांना वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले. भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यामागेही आता EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीच्या नेत्यानंच केले बेछूट आरोप... एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे. जळगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर बेछूट आरोप केले होते. एकनाथ खडसे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका देखीव त्यांनी केली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर या तीन ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हेही वाचा...मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटवणे परवडणार का? विनायक मेटेंचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण... प्रफुल्ल लोढा यांनी काल एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिलं आहे. रवींद्र पाटील म्हणाले, प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी काँग्रेसचे साधे सदस्यही नाहीत. त्यांचा आणि पक्षाची काही एक संबंध नसल्याचं सांगितलं. प्रफुल्ल लोढा यांनी खडसेंवर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ त्यांची बदनामी करण्याचा हा कट आहे. लोढा यांच्यावर खडसे अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती रवीद्र पाटील यांनी यावेळी दिली.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या