Home /News /national /

नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक

नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

नवरदेवाच्या ड्रेसमुळे लग्नाचा मंडप काही क्षणातचं युद्धाचं मैदान बनलं.

    भोपाळ, 09 मे : लग्न म्हटलं की धम्माल, मजामस्तीशिवाय, रुसवे-फुगवे, किरकोळ वादही असतातच. मानपान किंवा इतर काही कारणांवरून भांडणं होतात. वधू-वर पक्षांमध्ये काही खटके उडतात. मध्य प्रदेशमधील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा आहे. ज्यात चक्क नवरदेवाच्या कपड्यांवरून राडा झाला आहे (Clash between bride groom family in wedding). लग्नात मग अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी दगडफेकच झाली (Stone pelting in wedding). मध्य प्रदेशच्या मंगबेदा गावातील हे प्रकरण आहे. नवरदेवाने असे कपडे घातले की लग्नमंडप हा काही क्षणातच युद्धाचं मैदान बनलं. वधूच्या नातेवाईकांनी आपल्या पंरपरेनुसार वराला धोती-कुर्ती घालायला सांगितला होता. पण त्याने शेरवानी घातल्याने हा वाद उफळला. वधू आणि वर पक्ष आपसात भिडले. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे वाचा - VIDEO - उतावळा नवरा अन्...; वरमाला घालताच भरमंडपात असं काही केलं की नवरीलाही वाटली लाज झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार धामनोद पोलीस स्टेशनचे इनचार्ज सुशी यदुवंशी यांनी सांगितलं की, नवरदेवाने धोती-कुर्त्याऐवजी शेरवानी घातल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाले आणि वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं. दोन्ही पक्षांनी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार वधू पक्षाकडून काही वाद नव्हता पण त्याच्याकडून आलेले नातेवाईक त्यांना त्रास देत होते. नवरदेवाच्या काही नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलनही केलं. काही महिलांनी दावा केला आहे की, वधूच्या नातेवाईकांना दगडफेक केली ज्यामुळे लोक जखमी झाले आहेत. हे वाचा - मुसळधार पावसामुळे संपूर्ण मंडप पाण्याने भरला; तरीही जागेवरुन उठले नाहीत नवरदेव-नवरी, अनोखा VIDEO आता लग्नातच असं युद्ध झाल्यानंतर लग्नाचं पुढे काय झालं असावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या लढाईचा शेवट सुखदच ठरला. अखेर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न मात्र रितीरिवाजानुसार पार पडलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bridegroom, Marriage, Viral, Wedding

    पुढील बातम्या