नागपूर, 17 मे : पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना (ncp woman workers) भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) यांनी हात तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर, 'ज्यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी का बोलल्या नाही, असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केला आहे.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
'सुप्रिया ताई यांनी ज्या प्रकारे भूमिका मांडली, ती त्यांनी सगळ्याच बाबतीत घेतली पाहिजे. नवनीत राणा यांच्यावरही कारवाई झाली होती, त्यावेळी त्या काही बोलल्या नाही. मध्यंतरीच्या काळात आमच्याही महिलांवर असे हल्ले झाले होते, पोलिसांनी त्यावेळी वाईट वागणूक दिली होती. सुप्रिया सुळे यांनी जर याबद्दल भूमिका घेतली तर मी त्यांचं स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
(धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; पापणीचे झाले 2 तुकडे)
तसंच, 'पोलिसांच्या संरक्षणात भाजप नेत्यांवर हल्ले करणे, आमच्या सभामध्ये गोंधळ घालणे, आमच्या नेत्यांच्या अंगावर टोमॅटो आणि अंडे फेकणे हे स्पष्ट दिसत आहे. केवळ आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहे आणि त्या तोऱ्यात हे काम सुरू आहे. आम्ही आधी तक्रार करू जर कारवाई केली नाही तर आम्ही सुद्धा सोडणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
तसंच, संभाजीराजे हे अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढत आहे. त्यांना कोणत्या पक्षात किती जागा आहे, त्यांना कुणी पाठिंबा द्यावा, हा त्यांचा निर्णय आहे, ते सक्षम आहे. शिवसेनेने स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी काय ठरवायचे त्यावर काही मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
(Apprenticeship म्हणजे नक्की काय? शिक्षणानुसार यामध्ये किती मिळतो Stipend? वाचा)
'हा शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात सर्व महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. आता यापुढे या राज्यात कुठल्या पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल, काय लावलं आहे हे? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.