जोधपूर, 17 मे : रुग्णालय जिथं कित्येक रुग्णांवर उपचार होत असतात. या रुग्णांच्या समस्या वाढवू नयेत किंवा इतरांंपर्यंत आजार पसरू नयेत यासाठी इथं स्वच्छता आणि इतर गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली जाते. ती नाही घेतली तर त्याचा काय भयंकर परिणाम होऊ शकतो, याचंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे, बेजबाबदारपणा उघड झाला आहे. रुग्णालयात रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले आहेत. यामुळे त्या रुग्णाच्या पापण्यांचेही दोन तुकडे झाले आहेत (
Rajasthan Kota Rat Bites Patient Eye).
राजस्थानच्या कोटामधील एमबीएस रुग्णालयातील
(Kota MBS Hospital) हा धक्कादायक प्रकार. स्ट्रोक युनिटमध्ये एक महिला रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. या महिलेला लकवा मारला आहे. तिच्या मानेखालील शरीराच्या भागांची बिलकुल हालचाल होत नाही. गेल्या 40 दिवसांपासून ती या रुग्णालयात दाखल आहे.
हे वाचा - शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान
सोमवारी रात्री उशिरा तिच्या डोळा उंदराने कुरतडला. तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. महिलेचा डोळा पाहून डॉक्टर आणि नर्सलाही धक्का बसला.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार महिलेच्या डोळ्यांच्या पापण्याचे दोन तुकडेही झाले. तिच्या पापण्यांना टाके घालण्यात आले आहेत.
मुंबईतही घडला होता असा प्रकार
गेल्या वर्षी मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातही
(Rajawadi Hospital) दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा
(Rat bites eyes of patient) धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला.
श्रीनिवास यल्लपा असं या रुग्णाचं नाव होतं. राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचंही समोर आलं. उपचार सुरू असताना त्याच्या नातेवाईकांना त्याच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. बेशुद्ध अवस्थेत असताना उंदराने त्याचे डोळे कुरतडले, असा आरोप नातेवाईकांना केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.