जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: अन् मंत्र्यालाच पडला विसर, मास्कच लावला नाही; विधान भवनात प्रवेश करताच आली आठवण, मग केलं असं की...

VIDEO: अन् मंत्र्यालाच पडला विसर, मास्कच लावला नाही; विधान भवनात प्रवेश करताच आली आठवण, मग केलं असं की...

VIDEO: अन् मंत्र्यालाच पडला विसर, मास्कच लावला नाही; विधान भवनात प्रवेश करताच आली आठवण, मग केलं असं की...

आज अधिवेशनचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसून येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर: सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू आहे. आज अधिवेशनचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. कालच सदस्यांनी मास्क न घातल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी नाराजी दर्शवली होती. आज बड्या नेत्यालाच मास्क घालण्याचा विसर पडला आहे. मात्र आपण मास्क न घातल्याचं लक्षात त्यांनी लगेचच मास्क घातला. सभागृहात प्रवेश करताना एकनाथ शिंदे तोंडावर मास्क लावण्यास विसरले होते. पण आठवण येताच लगेच त्यांनी मास्क लावला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात

काल अजित पवारांनी सर्वांना मास्क घालण्याची विनंती केली. काय म्हणाले अजित पवार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अध्यक्ष महोदय मला एका विषयाकडे आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं आजचा दुसरा दिवस आहे. आपण लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो. देशाचे पंतप्रधान सुद्धा सध्याच्या कोरोनाच्या संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत आणि रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा देशपातळीवर सुरू आहे. ठराविक लोक सोडली तर कुणीही येते मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं आहे हे पाहतोय. जर आपणच मास्क लावू शकत नाही तर… मी बोलताना पण मास्क लावतो. काहींना मास्क लावून बोलण्यात अडचणी येत असतील तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण बोलून झाल्यावर तरी मास्क लावला पाहिजे. आज इतकी वाईट परिस्थिती आहे की, परदेशात दीड दिवसाला दुप्पट रुग्णांची संख्या होत आहे. डब्ल्यूएचओने सांगितलं आहे की, पाच लाखांपर्यंत परदेशात लोक मृत्यूमुखी पडतील. हे झालं परदेशाचं आपलं महाराष्ट्र आणि देशाचं काय. काही काही गोष्टी ज्या त्या वेळीच त्यातं गांभीर्य लक्षात घेऊन.. कुणी जर मास्क लावला नसेल मग मी जरी मास्क नसेल लावला तरी मला बाहेर काढा, कुठंतरी गांभीर्याने घ्याना. माजी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की, मास्क लावा. हेही वाचा-  Happy Birthday ‘गोल्डन बॉय’, जाणून घ्या नीरज चोप्राचा यशाचा आलेख अजित पवारांनी हे म्हटल्यानंतर अध्यक्षांनीही म्हटलं, सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की, सर्व सदस्यांनी आपले मास्क बोलण्यापूरते बाजूला करावे किंवा ज्याला शक्य आहे त्याने तोंडावर कायम मास्क ठेवावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात