मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Happy Birthday 'गोल्डन बॉय', जाणून घ्या नीरज चोप्राचा यशाचा आलेख

Happy Birthday 'गोल्डन बॉय', जाणून घ्या नीरज चोप्राचा यशाचा आलेख

भालाफेकपटू (Indian javelin star) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचं नाव घराघरात पोहोचलं आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये (athletics) देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची कामगिरी त्याने केली होती.

भालाफेकपटू (Indian javelin star) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचं नाव घराघरात पोहोचलं आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये (athletics) देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची कामगिरी त्याने केली होती.

भालाफेकपटू (Indian javelin star) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचं नाव घराघरात पोहोचलं आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये (athletics) देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची कामगिरी त्याने केली होती.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर:  टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला एकमेव सुवर्णपदक (gold medal) जिंकून देणारा भालाफेकपटू (Indian javelin star) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचं नाव घराघरात पोहोचलं आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये (athletics) देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची कामगिरी त्याने केली होती. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जेव्हा तो भारतात आला, तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करण्यात आले. या स्पर्धेनंतर नीरजच्या चाहत्यांची संख्याही वाढली असून, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. 'गोल्डन बॉय' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नीरजचा आज, शुक्रवारी (24 डिसेंबर) वाढदिवस आहे. 'झी न्यूज'ने त्याच्याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

नीरज चोप्रा आज, शुक्रवारी (24 डिसेंबर) 24 वर्षांचा झाला. या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावून वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा भारताचा दुसरा खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरापर्यंत भाला फेकून हे पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा तो पहिला भारतीय ऑलिंपियन आहे. ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणेच इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही नीरजची कामगिरी थक्क करणारी आहे.

बँकॉक येथे 2014 साली झालेल्या युवा ऑलिम्पिक पात्रता (Youth Olympics Qualification) स्पर्धेत नीरजने पहिलं आंतरराष्ट्रीय पदक जिंकलं होतं. या स्पर्धेत त्याला रौप्यपदक मिळालं होतं. तसंच 2016च्या दक्षिण आशियाई क्रीडा (South Asian Games) स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून त्याने सुवर्णपदक जिंकलं. त्या वेळी त्याने 82.23 मीटर लांबीवर भाला फेकला होता. तेव्हा ऑलिम्पिक पात्रतेसाठी आवश्यक असलेलं 83 मीटरचं लक्ष्य गाठण्यात तो थोडा कमी पडला; मात्र त्याच वर्षी म्हणजेच 2016 मध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये ( IAAF World Under-20 Championships) 86.48 मीटर थ्रोसह त्याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. असा विश्वविक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) त्याने सुवर्णपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळे नीरज घरोघरी पोहोचला आहे. गोल्डन बॉय म्हणून आता त्याची ओळख निर्माण झाली आहे. नीरजची पुढील स्पर्धा केव्हा आहे, त्या स्पर्धेत तो कशी कामगिरी करेल, त्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, अशी विविध माहिती मिळवण्याचा त्याच्या चाहत्यांचा प्रयत्न असतो. आज त्याचा वाढदिवस असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:
top videos

    Tags: Olympic, Sports