जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माझ्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? दीपक केसरकरांनी सांगितली Inside Story

माझ्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? दीपक केसरकरांनी सांगितली Inside Story

माझ्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? दीपक केसरकरांनी सांगितली Inside Story

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केसरकरांच्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काय केलं ते विसरू नये? असं वक्तव्य केलं होतं. पेडणेकरांच्या या वक्तव्यावर आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जुलै : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या (Eknath Shinde) बंडानंतर जवळपास रोजच शिवसेना (Shivsena) नेते आणि शिंदे गटातले नेते यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहेत. नेत्यांमधल्या या टीका आता वैयक्तिक पातळीवरही येत असल्याचं दिसत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केसरकरांच्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काय केलं ते विसरू नये? असं वक्तव्य केलं होतं. पेडणेकरांच्या या वक्तव्यावर आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या नातवासाठी इंटरनॅशनल स्कूलच्या अॅडमिशनसाठी उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. एवढ्या छोट्या गोष्टी तुम्ही बाहेर काढणार आहात, पण माझ्या नातवाला तिथे अॅडमिशन मिळाली नाही. मी आदरापोटी काही गोष्टी बाहेर काढल्या नाहीत, पण आता निश्चित बोलणार आहे, असं केसरकर म्हणाले. काल उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) वाढदिवस होता, चांगला दिवस होता. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही बोलणार नाही, हे आधीच ठरवलं आहे. आम्हीही बोलू शकतो, पण बोलायची वेळ तुम्ही आणली आहे, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं. ‘आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) माझ्या मतदारसंघात जाणार आहेत, त्यांनी जावे. गद्दारऐवजी विश्वासघातकी बोलत आहेत. देशात पहिल्यांदा असं झालं, जेव्हा मुख्यमंत्र्यांचं ऑपरेशन झालं, तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला नाही. प्रभारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना देता आलं असतं इतका विश्वास तुमचा नव्हता. विश्वास न ठेवताच विश्वासघातकी बोलत आहात. एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणणं योग्य नाही,’ असा निशाणा केसरकरांनी साधला. ‘2019 ला राजीनामा देऊन निवडून आला नाहीत. आम्ही कमजोर आहे, असं समजू नका. आम्ही आदर करतोय त्याचा स्वीकार करा. आयुष्य वेचलेल्या माणसाला तुम्ही विश्वासघातकी बोलत आहात. कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी खूप काम केलं आहे, शिवसेनेची ओळख एकनाथ शिंदे आहेत,’ अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात