पंढरपूर, 04 जून : राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आता आमनेसामने आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. संजय राऊत हे कोण आहे, ते काय तत्वज्ञानी आहेत का? असा सवाल करत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvsi) यांनी संजय राऊतांना (sanjay raut) खोचक टोला लगावला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या आमदार निधीतून औसा तालुक्यातील एक हजार किलोमीटर शेतरस्ते, मनरेगातून निर्माण करण्यात आलेले जनावरांचे एक हजार गोठे आणि बाराशे हेक्टरवरील फळबाग लागवड या सर्व कामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलंय. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या कामांचे कौतुक यावेळी फडणवीसांनी केलंय. ( आणि ‘तो’ सीन असलेला भाग प्रदर्शित झाला…’ आधी ट्रोल आणि आता प्राजक्ताचं कौतुक ) महाविकास आघाडी सरकारनं भाजपच्या काळात सुरू करण्यात आलेल्या सर्व शेतकरी कल्याणासाठीच्या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांचं काही देणंघेणं नाही अशी टीका देखील यावेळी फडणवीसांनी केली. ( 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक! ) या कार्यक्रमानंतर संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मुद्यावरून टीका केली होती, त्याबद्दल विचारले असता, कोण संजय राऊत ते काय तत्वज्ञानी आहेत का ? ते दिवसभर काही ना काही बोलत असतात त्यांना उत्तर का द्यायचे असा खोचक टोला फडणवीसांनी राऊत यांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.