मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमधील त्या 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू कशामुळे, सरकारने स्थापन केली समिती

ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमधील त्या 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू कशामुळे, सरकारने स्थापन केली समिती

 आज सकाळी वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन आले 'आपले रुग्ण गंभीर अवस्थेत असून लवकर या'

आज सकाळी वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन आले 'आपले रुग्ण गंभीर अवस्थेत असून लवकर या'

आज सकाळी वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन आले 'आपले रुग्ण गंभीर अवस्थेत असून लवकर या'

ठाणे, 26 एप्रिल: नाशिकमधील (Nashik oxygen leak) हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा लिक झाल्यामुळे 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये खबरदारी घेतली जात असताना ठाण्यातील (Thane) वेदांत हॉस्पिटलमध्ये (Vedanta Hospital) आज सकाळी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णांचा प्रकृती गंभीर होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमार्फत फोन आले 'आपले रुग्ण गंभीर अवस्थेत असून लवकर या' अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच वेदांत हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी करायला सुरुवात केली. बघता बघता या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांना देखील हॉस्पिटल बाहेर गर्दी करायला सुरुवात केली.

'हापूस' खरेदी करताय मग एकदा हे वाचाच, देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा

या दरम्यान हॉस्पिटलमधील 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पण हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतीत मात्र कोणतेही अधिकृत माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना तसंच प्रसारमाध्यमांना न दिल्याने नेमकी काय घटना घडली आहे याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले. अखेर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आणि अशोक बुरपुल्ले तसंच ठाणे महानगरपालिकेचे काही कनिष्ठ अधिकारी यांनी वेदांत हॉस्पिटलला भेट दिली. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप नेते किरीट सोमय्या,  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे या सोबतच अनेक राजकीय नेत्यांनी देखील वेदांत हॉस्पिटलला गर्दी करायला सुरुवात केली. यामुळेच वेदांत हॉस्पिटलवर प्रचंड दबाव निर्माण झाला.

ऊन-पावसाचा खेळ सुरूच; उत्तर कोकण वगळता राज्यात अवकाळीचा इशारा

वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले covid-19 रुग्णांपैकी चार रुग्णांचा कशामुळे मृत्यू झाला याची माहिती हॉस्पिटलला अधिकृतपणे जाहीर करावी लागणार आहे. यासंबंधी समिती देखील स्थापन करण्यात आली असून जर यामध्ये हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी जर माहिती चौकशी समोर आली तर हॉस्पिटलवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे देखील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

6 सदस्यांची चौकशी समिती स्थापन

ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदसीय समिती गठीत करण्यात आली आहे.  भिवंडी महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती असणार आहे. या समितीमध्ये मुख्य सचिव, ठाणे महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, वैदकीय अधिकारी यांचा समावेश आहे.  चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला की इतर कारणास्तव याची  चौकशी करणार आहे, अशी माहिती  अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Nashik, Oxygen leak, Oxygen supply