पुरग्रस्तांच्या मदतीवरून उर्मिलाने 'बॉलिवूड'ला सुनावलं, म्हणाली...

पुरग्रस्तांच्या मदतीवरून उर्मिलाने 'बॉलिवूड'ला सुनावलं, म्हणाली...

छोट्या माणसांचीच मनं मोठी असतात. याचा अनुभव कायम येत असतो. आता पुनर्वसनावर सर्व लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज आहे.

  • Share this:

असिफ मुरसल, सांगली 14 ऑगस्ट : अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज पूरग्रस्त सांगलीची पाहणी केली. त्यांनी सांगलीवाडी, गणपती पेठ या भागाला भेट देऊन लोकांशी संवाद साधला आणि मदतही केली. या महाभयानक आपत्तीत बॉलिवूडने मदतीचा हात पुढे केला नाही अशी टीका करण्यात येतेय. त्यावर बोलताना उर्मिला यांनी बॉलिवूडला चांगलंच सुनावलं. त्या म्हणाल्या मदत करा असं मी कुणाला सांगणार नाही. मात्र साधा वडापाव विकणारा आपल्या तुटपुंज्या कमाईतून मदत करतो. त्यामुळे आपल्याला लाज वाटली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं.

बलात्कारामुळे झाला मुलाचा जन्म? मृत चिमुकल्याची होणार DNA टेस्ट

त्या पुढे म्हणाल्या, छोट्या माणसांचीच मनं मोठी असतात. याचा अनुभव कायम येत असतो. यावेळची स्थिती भयानक आहे. आता पुनर्वसनावर सर्व लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज आहे. सरकार काम करत आहे. मात्र त्यांनी अजून करण्याची गरज आहे. मी माझा खारीचा वाटा उचलत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रानं मला भरभरून दिलंय त्याची थोडी  परतफेड करतेय त्याच भावनेतून मी इथे आलीय असंही त्या म्हणाल्या.

सरकार पुढचं आव्हान मोठं आहे, मात्र सरकार ला माय बाप म्हटलं जातं आताची मदत देऊन पुन्हा पुनर्वसन करावं. सांगली शहराची सांस्कृतिक नाट्य पंढरी अशी असलेली ओळख पुसली जाऊ नये यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, वारंवार सांगली मध्ये येऊन त्या बाबद आढावा घेत राहीन असंही त्या म्हणाल्या.

बाबासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न - कवाडे

आठ दिवसांमध्ये 8 कोटींची मदत

कोल्हापूर, सांगली, कराड या भागात आलेल्या महापुराच्या महासंकटाने अवघा महाराष्ट्र हेलावलाय. महापुराचं संकट आता ओसरलं आता. हजारो संसार उभारण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं. ते आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो हात पुढं येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री साह्यता निधीत तब्बल साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झालीय. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना धनादेश देण्यासाठी विविध संस्था आणि नागरिकांची रीघ  लागली होती. मदतीचा हा ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे संकटाच्या काळात धावून जाण्याची महाराष्ट्राची वृत्ती पुन्हा एकदा दिसून आलीय.

राज्यातील पूर परिस्थितीमुळे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला होणारं राज्य सरकारचं स्नेहभोजन आणि चहापान रद्द करण्यात आलंय. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे 14 ऑगस्टला विदेशी महावाणिज्यदूत आणि इतर मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात येतं, ते यंदा रद्द करण्यात आलंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading