बलात्कारामुळे झाला मुलाचा जन्म? मृत चिमुकल्याची होणार DNA टेस्ट

या महिलेचं लग्न झालं असून तिने आधीच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे का अशी विचारणा पोलिसांना केलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 07:21 PM IST

बलात्कारामुळे झाला मुलाचा जन्म? मृत चिमुकल्याची होणार DNA टेस्ट

नवी दिल्ली 14 ऑगस्ट : राजधानी नवी दिल्लीत बलात्काराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. बलात्कारामुळेच आपल्याला मुलं झालं. मात्र मित्राने अत्याचार केल्याने नऊ महिन्यांआधीच मृत मुलाचा जन्म झाला. त्यामुळे न्याय मिळावी अशी तक्रार एका पीडित महिलेने पोलिसांकडे केली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं असून कोर्टाने मृत मुलाची  DNA टेस्ट करण्याचा आदेश पोलिसांना दिलाय. पोलिसांना आता त्या चिमुकल्याचं पार्थिव स्मशानभूमीतून काढून त्याची DNA टेस्ट करावी लागणार आहे.

माहेरी आलेल्या पत्नीला 'तलाक..तलाक..तलाक' म्हणून निघून गेला पती

पीडित महिलेच्या या तक्रारीमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका व्यक्तिने आपल्याला लग्नाचं अमीष दाखवलं आणि संबंध ठेवले असा असा दावा महिलेने केलाय. तर आपण लिव्ह इन मध्ये राहत होतो असा दावा आरोप असलेल्या व्यक्तीने केलाय. लग्नाचं अमीष दाखवून तो बलात्कार करत असे असा आरोप महिलेने केलाय.

यातूनच गर्भवती राहिले असा दावा महिलेने केलाय. तो व्यक्ती नंतर मारहाण करू लागल्याने मृत मुलाचा जन्म झाला असा आरोप महिलेने केलाय. त्यामुळे दिल्लीच्या तिसहजारी कोर्टाने मुलाच्या DNA टेस्टचे आदेश दिले. या महिलेचं लग्न झालं असून तिने आधीच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे का अशी विचारणा पोलिसांना केलीय.

हिना खानचं राखी सेलिब्रेशन, युजर्स म्हणाले मुस्लीम असून ईद विसरलीस का?

Loading...

जर ती दुसरं लग्न करणार होती तर तीने घटस्फोट दिला होता का असाही प्रश्न कोर्टाने केलाय. मात्र ती महिला असे कुठलेही कागदपत्र सादर करू शकली नाही असं पोलिसांनी सांगितलंय.

पुराखाली गेलेल्या पुलावर तो धावला आणि अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग दाखवला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...