पाडापाडीचा खेळ; दौंडमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार मैदानात, राष्ट्रवादीला धक्का!

निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारांना हरविण्याचे अनेक डावपेच खेळले जातात. थेट लढत देऊन जेव्हा हरवणं शक्य नसतं तेव्हा पडद्यामागून डावपेच खेळले जातात.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 05:36 PM IST

पाडापाडीचा खेळ; दौंडमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार मैदानात, राष्ट्रवादीला धक्का!

सुमीत सोनवणे, दौंड 08 ऑक्टोंबर :  निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारांना हरविण्याचे अनेक डावपेच खेळले जातात. थेट लढत देऊन जेव्हा हरवणं शक्य नसतं तेव्हा पडद्यामागून डावपेच खेळले जातात. त्यात हमखास एक डाव खेळला जातो तो डाव म्हणजे मोठ्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाचं साम्य असलेला दुसरा उमेदवार उभा करणं. असं झालं तर एकाच नावाचे दोन उमेदवार होतात आणि मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. दौंड विधानसभा मतदारसंघात हाच अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश किसनराव थोरात यांना आलाय. याच मतदारसंघामध्ये त्यांच्यासारखच नाव असलेले एक अपक्ष उमेदवार उभे असून त्यांचंही नाव रमेश किसन थोरात असच आहे. एकाच नावाचे दोन उमेदवार उभे राहिल्यानं राष्ट्रवादी अडचणीत सापडलीय.

वाचा- 'काँग्रेस' आणि 'राष्ट्रवादी' एकत्र येतील, काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ नेताचा दावा

रमेश किसनराव थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढावीत आहे तर दुसरीकडे रमेश किसन थोरात हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहे. रमेश किसनराव थोरात हे दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि सध्या पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. रमेश किसनराव थोरात यांचे मतांचे लीड कमी करण्यासाठी विरोधकांनी ही खेळी तर केली नाही ना असा प्रश्न विचारण्यात येतोय. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश किसनराव थोरात विरुद्ध भाजपाचे राहुल कुल यांच्यात मुख्य लढत होत असताना मध्येच अपक्ष उमेदवार रमेश थोरात उभे राहिल्याने राष्ट्रवादीची अडचण झालीय.

वाचा- तुझ्या बापाला तुरुंगातच घालणार, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी

रमेश किसन थोरात यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीने बराच प्रयत्न केला. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी मतदारांची खरी परीक्षा होणार असून राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जिंकलेल्या मतांचा फरक हा तुलनेनं कमी असतो. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं असतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...