Home /News /maharashtra /

सोलापूरमध्ये डॉक्टरची आत्महत्या, हॉस्टेलमध्येच घेतला गळफास

सोलापूरमध्ये डॉक्टरची आत्महत्या, हॉस्टेलमध्येच घेतला गळफास

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यातच डॉक्टरांवरचा ताण वाढत आहे.

सोलापूर 04 ऑगस्ट:  सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलेय. चैतन्य धायफुले असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. चैतन्य धायफुले हा MBBS झाल्यानंतर सोलापूर शासकीय रुग्णालयात  शिकाऊ डॉक्टर (इंटर्नशीप) म्हणून कार्यरत होता. त्याने मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी त्याच्या कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहेत. मात्र अद्याप आत्महत्येचे मुख्य कारण समजलेले नाही. तो कोव्हिड रुग्णांवर उपचार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. मात्र याबाबत हॉस्पिटल प्रशासन आणि मेडीकल कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चैतन्यने आत्महत्या का केली याबाबतचे गूढ वाढलेले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यातच डॉक्टरांवरचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत ही घटना घडल्याने हॉस्पिटल प्रशासन हादरुन गेलं आहे. Covaxin लशीची मानवी चाचणी अडचणीत, व्हॉलेंटिअरच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं सोलापूरमध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या वाढत असल्याने व्यवस्थेवरचा ताण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची  संख्या जास्त वाढल्यास काय उपाययोजना करायच्या याविषयी प्रशासन चिंतेत आहे. सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने नवे डॉक्टर्स आणि नर्स कसे उपलब्ध होतील याचा प्रशासन विचार करत आहे. मात्र त्याबाबत आराखडा तयार होऊ शकला नाही. त्यामुळे असलेल्या डॉक्टरांवरचा ताण कमी करून त्यांना कार्यरत ठेवण्याचं पहिलं उद्दीष्ट प्रशासनासमोर आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Suicide case

पुढील बातम्या