पंढरपूर 26 जानेवारी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच छेडछाड काढली आणि त्या निर्भयाने हिंमत दाखवत त्या मुलाच्या कानाखाली वाजवली असल्याची घटना इथं घडलीय. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज मध्ये अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची सहा विद्यार्थ्यांनी गुरुवारी कशाही पद्धतीने बोलून छेड काढली होती. त्यादिवशी त्या विद्यार्थ्याने दुर्लक्ष केले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा त्याच विद्यार्थ्यांनी तिची छेड काढली. परंतु यावेळी ते तिला सहन झाले नाही. त्यामुळे तिने त्या विद्यार्थ्यांतील म्होरक्याचा मुलाला थप्पड मारली. परंतु त्या विद्यार्थ्याने ही तिला मारले.
मुलीची छेडछाड करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणले होते. त्यावेळी त्यांच्या पालकांनी पोलिसांना सांगितले यांचा अवतार पहा केस कापण्यासाठी पाठवल्यास स्टाईल करण्याच्या नावाखाली कसेही वाकडेतिकडे केस कापून येतात. त्यांचे येथेच मुंडन केले पाहिजे, असे पालकांनी सांगितले व विद्यार्थ्यांनाच एकमेकांचे मुंडन करायला लावले ची माहिती पोलीस कॉन्स्टेबल विलास आलदर यांनी दिली.
हेही वाचा...
काँग्रेसने PM मोदींना Amazon वरून पाठवली 170 रुपयांची खास भेट, दिला खोचक सल्ला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.