नवी दिल्ली 26 जानेवारी : CAAवरून देशात सुरू असलेलं आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. यावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केलाय. देशात, समाजात विभाजन घडवलं जातंय असा आरोप काँग्रेसने केलाय. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेची प्रत भेट दिलीय. Amazonवरून ही प्रत मोदींच्या पत्त्यावर पाठविण्यात आली असून त्याची 170 रुपये किंमत आहे. देशात फुट पाडण्याच्या तुमच्या कामातून वेळ मिळाला तर हे पुस्तक जरूर वाचा असा खोचक आणि बोचरा सल्लाही काँग्रेसने मोदींना दिलाय. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचं हे प्रचार युद्ध चांगलंच रंगणार आहे. काँग्रेसने ट्वीट करून ही टीका केलीय. राज्यघटनेचं पुस्तक लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल असंही काँग्रेसने म्हटलं आहे. गेल्या पंधरा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे.
Dear PM,
— Congress (@INCIndia) January 26, 2020
The Constitution is reaching you soon. When you get time off from dividing the country, please do read it.
Regards,
Congress. pic.twitter.com/zSh957wHSj
राजधानी दिल्लीतील थंडी ही प्रचंड बोचरी असते या बोचरी थंडीची तमा या महिलांनी बाळगली नाही आणि जवळपास 24 तास त्या आंदोलनात सहभागी असतात, काही महिला आजारी आहेत तरीपण बाजूला सहभागी आहे. काही महिलांची बालके शाळेत जातात त्यांना शाळेत पाठवल्यानंतर या महिला प्रदर्शनात सहभागी होतात अशा तऱ्हेने हे प्रदर्शन सुरू आहे.
On Republic Day, Congress says it's sending copy of Constitution to PM Modi
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2020
Read @ANI Story | https://t.co/F2zR8tuYwl pic.twitter.com/vvuYlBVvEh
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात रणकंदन माजले आहे. याची सुरुवात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अत्याचार झाले त्याचा निषेध म्हणून शाहीन बाग मध्ये प्रथम आंदोलनाला सुरुवात झाली.