Home /News /maharashtra /

नरेंद्र मोदींनी दिवे लावायला सांगितले, अतिउत्साही लोकांनी चक्क विहिरच पेटवली

नरेंद्र मोदींनी दिवे लावायला सांगितले, अतिउत्साही लोकांनी चक्क विहिरच पेटवली

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विजवली.

सोलापूर 05 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवेत लावत एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला सर्व देशातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सोलापूर जिल्ह्यात काही अतिउत्साही लोकांनी एका पडिक वहिरीलाच आग लावली. ही विहिर कचऱ्याने भरलेली होती. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी गावात अतिउत्साही लोकांनी पेटवली पडीक असलेली विहीर. कुर्डुवाडी बस स्टॅन्डच्या मागील बाजूस घडली घटना आहे. माहिती मिळाल्यानंतर  अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विजवली. काही जणांनी याचा व्हिडीओही तयार करून टीकटॉकवर टाकला आहे. कोरोनामुळे सर्व देशावर आलेले नकारात्मकतेचं मळभ दूर व्हावं म्हणून पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. गेली काही दिवस सगळ्याच माध्यमातून याची चर्चा होती. आज रात्री 9 वाजता सर्व देशभर लोकांनी आपल्या घराबाहेर दिवे लावले. हे दिवे लावताना घरातले दिवे बंद करण्यात आले होते. सगळ्यांनी एकदाच दिवे बंद केलेत तर अचानक मागणी कमी झाल्याने वीज वितरण यंत्रणा कोलमडून जाईल अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. त्यावर दावे प्रती दावेही केले जात होते. मात्र सगळचं काही सुरळीत पार पडलं. त्या 9 मिनिटांमध्ये सगळच सुरळीत राहावं यासाठी राज्यात वीज कंपन्यांचे 50 हजार कर्मचारी गेल्या 24 तासांपासून नियोजन करत होते. राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊथ हे नागपूरमधल्या नियंत्रण कंक्षातून सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्या 9 मिनिटांमध्ये विजेची मागणी तीन हजार मेगावॅट ने कमी झाली होती. 9 पुर्वी ही मागणी 13 हजार मेगावट एवढी होती. 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशवासीयांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 9वाजून 5 मिनीट मागणी 10हजार 120 मेगावॅट, पुन्हा 9 वाजून 12 मिनिटांनी 10 हजार 700 मेगावट एवढी झाली. तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानेही त्याबाबत माहिती दिली आहे. 9 मिनिटे दिवे बंद करताना 12000 मेगावॅट वीज कमी झाली. परंतु यामुळे ग्रिडमध्ये 32,000 मेगावॅटची घसरण झाली. आता ते पुन्हा सामान्य झाले आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंह यांनी दिली. शुभं करोती कल्याणम् , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केले PHOTOS देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Narendra modi, Solapur

पुढील बातम्या