मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाविरुद्ध लढा: 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशवासीयांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

कोरोनाविरुद्ध लढा: 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशवासीयांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 5 एप्रिल: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला नवी मुंबईत देखील चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. नवी मुंबईत सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांनी देखील मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावून या आवाहनाला प्रतिसाद दिला. या निवारा केंद्रात 240 नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यांनी देखील आपण एक असून कोरोनाविरुद्ध सर्व मिळून ताकदीने लढण्याचा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी टाळ्या देखील वाजवत पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला. Delhi: PM Narendra Modi lights a lamp after turning off all lights at his residence. India switched off all the lights for 9 minutes at 9 PM today & just lit a candle, 'diya', or flashlight, to mark India's fight against #Coronavirus as per his appeal. pic.twitter.com/apLIVmMCTf नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी रात्री ठीक 9 वाजता राजभवन, मुंबई येथे विद्युत दिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यास देश एकत्र आहे हा संदेश दिला. 'Responding to the call given by Prime Minister Narendra Modi, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari lighted traditional lamps at 9 pm at Raj Bhavan, Mumbai to express solidarity with the nation in its fight against the challenge posed by COVID -19.' दरम्यान, संपूर्ण देशासमोर कोरोना व्हायरसचं (Coronavirus)संकट आहे. देशात 3,500 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 83 जणांचा या रोगानं बळी घेतला आहे. तर जगभरात 11 लाखांहून जास्त नागरिकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा झाली आहे. LIVE UPDATES... - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांनी पेटवला दीपक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद : घराघरात पेटले दिवे -  मोबाइलचे फ्लॅशलाइट्स लवून दिल्या भारत माता की जय... वंदे मातरम् च्या घोषणा - बॉलिबूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मेणबत्ती प्रज्वलित केली. -केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, भाजप नेते प्रवेश वर्मा, भाजप आमदार परिणय फुके यांनी कुटुंब समवेत मेणबत्ती लावली. - दिल्ली एअरपोर्टवर कर्मचाऱ्यांनी फ्लॅश लाइट दाखवून एकता दाखवली. - भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी परिवारासोबत दिवे लावले. Telanagana: Chief Minister K. Chandrashekar Rao light up a candle following the call of PM Modi to switch off all the lights of houses today at 9 PM for 9 minutes, and just light a candle, 'diya', or mobile's flashlight, to mark India's fight against #Coronavirus. pic.twitter.com/fPFN20vciF
First published:

पुढील बातम्या