मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खासदार उदयनराजे भोसले अखेर मैदानात; म्हणाले, सगळा वेड्यांचा बाजार

खासदार उदयनराजे भोसले अखेर मैदानात; म्हणाले, सगळा वेड्यांचा बाजार

Mumbai: NCP MP Udayanraje Bhosale addresses a press conference, in Mumbai, Monday, June 24, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI6_24_2019_000109B)

Mumbai: NCP MP Udayanraje Bhosale addresses a press conference, in Mumbai, Monday, June 24, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI6_24_2019_000109B)

'यावर सगळेच खूप बोलत आहेत. सगळा वेड्याचा बाजार आहे. ही लढाईची वेळ नाही आणि काळही नाही.'

    सातारा 2 जुलै: सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची (Covid-19 Patient) संख्या वाढत आहे. कोरोनामुळे सगळीकडेच परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayan Raje Bhosale ) शांतच होते. ते अनेक दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातल्या (Satara District) घडामोडींपासून चार हात लांब आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती. मात्र मागील दोन चार दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. उदयनराजे आता मैदानात उतरले असून आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणाही साधला.

    गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपलं मत मांडले. लॉकडाउन उठविण्यासंदर्भात राज्यातील तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी बैठक घेऊन काय उपाययोजना करायच्या हे ठरवायला हवे. लोकांमध्ये सध्य असंतोष असून तो फार काळ राहणे चांगला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच सातारा दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी त्यांना निवेदन का दिलं नाही असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल मला अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यांना वाटते माहिती कळाली तर आम्हाला दौरे पडतात त्यामुळे कोणाचे दौरे समजत नाही. पण आम्हालाही सर्व समजतं असा टोलाही त्यांनी लगावला.

    ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला खुलासा

    उदयनराजे पुढे म्हणाले, केंद्रातल्या आणि राज्यातल्या लोकांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. लोकांची सहनशक्ती संपत आली असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उद्रेक झाला तर कंट्रोल करता येणार नाही. केवळ कोरोनामुळेच मृत्यूच होतो असे नाही. त्यामुळे या भीतीखाली किती दिवस जगणार असा सवाल त्यांनी केला.

    सगळीकडे केवळ कोरोनाबद्दल चर्चा आहे इतर आजाराने जे बाधित आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे. कोरोना मुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन झाले पाहिजे.

    अरे देवा! महाराष्ट्राच्याCovid-19 Task Forceच्या तज्ज्ञ डॉक्टरलाच झाला कोरोना

    भारत चीन सीमाप्रश्नाच्या तणावावर ते म्हणाले, यावर सगळेच खूप बोलत आहेत. सगळा वेड्याचा बाजार आहे. ही लढाईची वेळ नाही आणि काळही नाही. सगळ्यांनी एक झालं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

    संपादन - अजय कौटिकवार

     

    First published:

    Tags: Ajit pawar, Udyanraje Bhosle