मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉकडाऊन: नवरा बायको घरीच असल्याने 'फोन'मुळे बिंग फुटले, दोघांचीही अफेअर्स चव्हाट्यावर

लॉकडाऊन: नवरा बायको घरीच असल्याने 'फोन'मुळे बिंग फुटले, दोघांचीही अफेअर्स चव्हाट्यावर

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सएपच्या क्लिक टू चॅट फीचरमुळे हा गोंधळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सएपच्या क्लिक टू चॅट फीचरमुळे हा गोंधळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

पतीचे इतर मैत्रिणीबरोबर तर पत्नीचे इतर मित्रांबरोबर होत असलेल्या चॅटींग मुळे वादास तोंड फुटले आहे.

बारामती 14 एप्रिल: कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कुणालाही घराबाहेर पडता येत नाही. संपूर्ण दिवस हा घरात बसूनच काढावा लागतो. कधी नव्हे ते नवरा-बायको 24 तास एकमेकांच्या सहवासात राहत आहेत. कामाच्या व्यस्ततेमुळे एकमेकांना वेळ देता येत नाही असं कायम सांगणाऱ्या दोघांचेही आता खरे रंग दिसून येत आहेत. दोघेही घरीच असल्याने ऐकमेकांना येणारे फोन्स आणि वॉट्सअप चॅटमुळे आता अनेक अफेअर्स बाहेर येत असून गृहकलहात वाढ झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. सगळे घरीच असल्यामुळे घरातली मुलं फोनवरच असतात. कधी कुणाचा फोन कुणाकडे जाईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे नवऱ्याचा फोन बायकोच्या हातात लागला किंवा बायकोटा फोन नवऱ्याच्या हातात आला की ते ऐकमेकांचे फोन्स चेक करतात. संपूर्ण दिवस टीव्ही बघण्यात, फेसबूक, व्हॉट्सॲप इतर करमणुकीच्या माध्यमातून आपला दिवस घालवतात एकमेकांचे मोबाईल फोन दोघेही हाताळत असताना एक गंभीर बाब समोर आली. यामध्ये घरात असताना पती-पत्नी यांचे येणारे फोन तसेच व्हॉट्सॲप मेसेज चॅटिंग मुळे गृहकलहाच्या अनेक तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये पतीचे इतर मैत्रिणीबरोबर तर पत्नीचे इतर मित्रांबरोबर होत असलेल्या चॅटींग मुळे वादास तोंड फुटले आहे. मोबाईलचा पासवर्ड काय? कुणाशी चॅटींग करत होतास? ही कोण आहे, ती कोण होती? कधी सुरवात झाली आहे अशा अनेक मॅसेज मुळे गृह कलहाच्या वादाला तोंड फुटलं आहे.

'या' देशात CoronaVirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम

अनेकांनी तर थेट पोलिस स्टेशनला जाऊन आपल्या  तक्रारी दाखल केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर गुन्हे कमी मात्र अशा प्रकारच्या पती-पत्नींमधल्या वाद आणि तणावाच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येऊ लागल्या आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहीती दिलीय. याच प्रमाण ग्रामीण भागात जर एवढं असेल तर शहरांमध्ये काय होत असेल? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पोलिसांनी देखील प्रकरण न वाढू देता सामोपचाराने सोडविण्याचा सल्ला देत आहेत. गरज पडल्यास

कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित?

वाद न घालता आपण घरातच बसून कुटुंबियांसमवेत मनोरंजन करावे.  बारामती मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या  मानसोपसचार तज्ज्ञांकडून थेट किंवा ऑनलाईन समुदेशनही उपलब्ध करून दिलं जात आहे. कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत कुटुंबांमध्ये नव्या संकटाला आमंत्रण देऊ नका. असलेले, नसलेले, निर्माण झालेले समज-गैरसमज मिटवा आणि घरात शांतता निर्माण करा असा सल्ला पोलीस या पती-पत्नींना देत आहेत. गरज पडली तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती, इथल्या मानसोपचार शास्त्र विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन इथल्या डॉक्टरांनी केलं आहे. कोरोना विषाणू साथीमुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. 1.चिंता, अनिश्चितता, निराशा, भिती, धडधड, बेचैनी, उदासी, सहायता आणि असुरक्षितपणाचा इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत आहे. 2.बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाऊ शकते. 3.नकारात्मक व आत्महत्येचे विचार मूळ धरू शकतात. 4.वेळ जात नसतो आणि झोपही लागत नसते अशा अवस्थेत माणूस सैरभैर होऊ शकतो. 5.चिडचिड होऊन कौटुंबिक वाद वाढू शकतात. 6. भास, भ्रम, संभ्रम, भीती, संशय, शंका, गैरसमज यापैकी कोणतीही किंवा कसलीही तक्रार जाणवल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास किंवा काही गैरसमज वाटल्यास आपण मनमोकळेपणाने आमच्याशी बोलू शकता. 7. तीव्र व अतितीव्र प्रकारांच्या मानसिक आजारांसाठी व लक्षणांसाठी समोरासमोर प्रत्यक्ष समुपदेशनाची सोय करण्यात आलेली आहे. आम्ही नागरिकांसाठी समुपदेशन सल्लामसलत व औषधोपचार या सुविधा ऑनलाइन व व्हॉट्सऍप व टेलिफोन वरून देत आहोत. तरी गरज असणाऱ्या नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या सुविधेचा जरूर फायदा घ्यावा.
First published:

Tags: Baramati

पुढील बातम्या