कोल्हापूर, 18 मार्च: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या (Kolhapur news) मंदिरात दर्शन वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. शुक्रवारपासून म्हणजेच 19 मार्चपासून संध्याकाळी सहानंतर अंबाबाईचं दर्शन (kolhapur Ambabai madir darshan timing chaged) घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. Coronavirus च्या वाढत्या रुग्णांमुळे खबरदारी म्हणून हा बदल करण्यात आला आहे.
कोल्हापूरची महालक्ष्मी हे राज्याचंच नाही तर देशातल्या अनेकांचं दैवत आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात (mahalaxmi temple kolhapur) नेहमीच राबता असतो. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती (Coronavirus latest updates) गंभीर होत आहे. कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना अजूनही आटोक्यात आहे; पण अंबाबाई मंदिरात पुण्या-मुंबईसह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे धोका वाढतो आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
यापूर्वी मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत होती; पण आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मंदिर खुले राहणार आहे. संध्याकाळी सहानंतर मंदिराचं दार बंद होणार असून अंबाबाईचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. दर्शनाची वेळ तीन तास कमी करण्यात आली आहे. मंगळवार आणि शुक्रवार तसंच सुट्टीच्या दिवशी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे यापूर्वी जी नियमावली होती ती देवस्थान समितीने पूर्ववत ठेवली आहे. Corona नियम पाळूनच दर्शन होईल. मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसंच हात सॅनिटायझ करूनच आत प्रवेश मिळेल. थर्मल स्क्रीनिंग हे प्रवेशद्वारावर केलं जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात अचानक गर्दी करू नये असे आवाहन ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे.
91 लाखाची बोली लावून उचलला नागेश्वर महाराज यात्रेतील मानाचा विडा, का आहे खास?
दरम्यान गेल्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 46 रुग्ण सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी भाविकांनी स्वतःहून मास्क परिधान करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दर्शन घेताना दर्शन रांगेमध्ये ही सुरक्षित अंतर ठेवूनच भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनाला जाणे गरजेचं आहे.
पुण्यात कोरोना बळींचा आकडा 5 हजारपार; नागपुरातही कहर! एका दिवसात राज्याने मोडलं सप्टेंबरचं टोक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Kolhapur