मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वीजबिल माफीवरून कोल्हापूरात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन; राष्ट्रीय महामार्ग अडवला

वीजबिल माफीवरून कोल्हापूरात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन; राष्ट्रीय महामार्ग अडवला

कोल्हापूरात मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर (Farmer Protest in Kolhapur) उतरले आहेत. वीजबिल माफी साठी त्यांनी कोल्हापूरातून बेळगावकडे जाणारा महामार्ग क्रमांक 4 (National highway no. 4) रोखून धरला आहे.

कोल्हापूरात मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर (Farmer Protest in Kolhapur) उतरले आहेत. वीजबिल माफी साठी त्यांनी कोल्हापूरातून बेळगावकडे जाणारा महामार्ग क्रमांक 4 (National highway no. 4) रोखून धरला आहे.

कोल्हापूरात मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर (Farmer Protest in Kolhapur) उतरले आहेत. वीजबिल माफी साठी त्यांनी कोल्हापूरातून बेळगावकडे जाणारा महामार्ग क्रमांक 4 (National highway no. 4) रोखून धरला आहे.

कोल्हापूर, 19 मार्च: कोरोना काळात अनेक नागरिकांना महावितरणाने वाढीव वीजबिलं (Electricity Bill Protest) पाठवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांनी ही वाढीव  वीजबिलं माफ करावीत, अशी मागणी केली होती. मात्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता कोल्हापूरात मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर (Farmer Protest in Kolhapur) उतरले आहेत. वीजबिल माफी साठी त्यांनी कोल्हापूरातून बेळगावकडे जाणारा महामार्ग क्रमांक 4 (farmer protest on National highway no. 4) रोखून धरला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी अचानक रस्त्यावर उतरल्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे. तसेच अनेक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मास्क परिधान केला नाही, तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवण्यात आला आहे. खंरतर या अंदोलनासाठी प्रशासनाकडून कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नाही. कोरोना विषाणू संदर्भातील सर्व नियम डावलून हा रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनालाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलं असून यामध्ये माकप, भाकप आणि इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. माजी खासदार राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूने रस्ता रोखून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर हा रास्ता रोको करण्यात आल्याने कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना अडकून पडावं लागत आहे. तसेच कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांही या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा -कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन संध्याकाळी बंद; शुक्रवारपासून वेळेत बदल

ज्या नागरिकांनी वीजबिलं भरली नाहीत, त्यांच्यावर महावितरणाकडून कारवाई केली जात आहे. त्यांचं वीज कनेक्शनही तोडण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजबिलं भरणार नाही, अशी ठोस भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. याठिकाणी पोलीस आणि इतर सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जोपर्यंत वीजबिल माफ केलं जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असंही आंदोलक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिल माफीमुळे आता राज्य सरकारच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.

First published:

Tags: Electricity, Farmer protest, Kolhapur